सोमवार, १४ मे, २०१८

नासा पाठविणार मंगळावर स्वयंचलित हेलिकॉप्टर - १३ मे २०१८

नासा पाठविणार मंगळावर स्वयंचलित हेलिकॉप्टर - १३ मे २०१८

* अमेरिकेची नासा अंतराळ संशोधन २०२० मधील मंगळ मोहिमेत अतिप्रगत रोव्हरसोबत [एक प्रकारची गाडी] छोटे हेलिकॉप्टरही मंगळावर पाठविणार आहे. पृथ्वीवरील हवाई वाहनाच्या परग्रहावर वापराची ही पहिलीच वेळी आहे.

* नासाने म्हटले की २०२० च्या मोहिमेत रोव्हरसोबत हेलिकॉप्टर मंगळाच्या पृष्ठभागावर नेवून ठेवल्यानंतर रोव्हरला सुरक्षित अंतरावर थांबण्याचे निर्देश मिळतील.

* बॅटऱ्या चार्ज झाल्यावर व चाचण्या घेतल्यावर पृथ्वीवरील नियंत्रण कक्षातून स्वचलित हेलिकॉप्टरला उड्डाणाच्या कमांड मिळतील.

* कसे असेल हेलिकॉप्टर - स्वचलित रिमोट कंट्रोलने चालणारे, वजन १.८ किलोग्रॅम. परस्परविरुद्ध फिरणाऱ्या पात्यांच्या २ जोड्या, त्यांचा वेग मिनिटाला तीन हजार फेऱ्या, सौरऊर्जेसाठी लिथियम अयॉन बॅटऱ्या, प्रचंड थंडी असताना उबदार ठेवण्याची व्यवस्था. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.