शुक्रवार, ४ मे, २०१८

जस्टीन लँगर ऑस्ट्रेलियन संघाचे नवे प्रशिक्षक - ४ मे २०१८

जस्टीन लँगर ऑस्ट्रेलियन संघाचे नवे प्रशिक्षक - ४ मे २०१८

* डॅरेन लेहमन पायउतार झाल्यानंतर माजी कसोटीपटू जस्टीन लँगर यांची ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.

* दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान चेंडूला आकारात फेरफार करताना ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज कॅमेरून बँक्रॉफ्ट रंगेहात पकडला गेला.

* या प्रकररणाची आपल्याला माहिती होती असे कबुल केल्यामुळे कर्णधार स्टीवन स्मिथ आणि प्रकरणाचा सूत्रधार म्हणून डेव्हिड वॉर्नर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघात मोठे फेरबदल केले आहेत.

* त्यानुसार ८७ वर्षीय लँगर यांची कसोटी, एकदिवसीय आणि २०-२० संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. त्यांचा कालावधी ४ वर्षाचा असेल.

* प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर त्यांच्या कालावधीत दोन ऍशेस मालिका, विश्वचषक स्पर्धा, आणि आयसीसी २०-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. ते ३ वर्षांपासून ऑस्ट्रेलियाचे सहायक प्रशिक्षक होते.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.