शुक्रवार, ११ मे, २०१८

राज्याचे अतिरिक्त महासंचालक हिमांशू रॉय यांची आत्महत्या - ११ मे २०१८

राज्याचे अतिरिक्त महासंचालक हिमांशू रॉय यांची आत्महत्या - ११ मे २०१८

* राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आस्थापन हिमांशु रॉय यांनी आत्महत्या केली आहे. राज्याचे दहशतवादीविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम बजावलेल्या हिमांशू रॉय यांनी गोळी झाडून आयुष्य संपवल आहे.

* मुंबईतील राहत्या घरी त्यांनी आयुष्याची अखेर केली. रॉय यांच्या आत्महत्येचे पोलीस क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

* गेल्या काही दिवसापासून हिमांशु रॉय हे दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्याच आजाराला कंटाळून हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.

* डॅशिंग आयपीएस अधिकारी आणि सरळमार्गी अधिकारी म्हणून हिमांशू रॉय ओळखले जात होते. हिमांशू रॉय हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते.

* त्यांनी चार वर्ष मुंबई क्राईम ब्रांचमध्ये काम केलं होत. तर एटीएस प्रमुख ते अधिक चर्चेत आले. हिमांशू रॉय यांनी अनेक हायप्रोफाईल प्रकरण हाताळली. यात जेडे हत्याप्रकरण आयपीएल सट्टेबाजी प्रकरणाचा समावेश होता.

 * मात्र दोन वर्षांपूर्वी त्यांना दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यामुळे ते मेडिकल लीव्हवर होते. आजारपणामुळेच त्यांनी आयुष्य संपवलं असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु शवविच्छेदन अहवालातून खरं कारण समोर येईल.

* हिमांशु रॉय यांनी २०१३ मधील आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अनेक अटकसत्र केलं होत. त्यांनीच बिंदू दारासिंहला बेड्या ठोकल्या होत्या.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.