गुरुवार, १० मे, २०१८

पुणे येथील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला ३५१५ कोटी मंजूर - १० मे २०१८

पुणे येथील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला ३५१५ कोटी मंजूर - १० मे २०१८ 

* पुरंदर येथील नियोजीत आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २ हजार ३६७ हेक्टर जागा संपादित करण्याच्या सुमारे ३ हजार ५१५ कोटी रुपयांच्या खर्चास राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी दिली आहे. 

* पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवाडी, मुंजवाडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या सात गावातील जागा राज्य सरकारकडून विमानतळासाठी निश्चित करण्यात आली आहे. या जागेला केंद्राच्या विविध विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. 

* या विमानतळासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनासाठी येणाऱ्या खर्चास मंजुरी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या स्तरावर प्रलंबित होता. 

* राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीत विमानतळाच्या भूसंपादनासाठीच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. 

* त्यामध्ये जमिनीच्या मोबदल्यापोटी २ हजार ७१३ कोटी रुपये रुपये, तर फळझाडे, विहिरी, ताली इत्यादीसाठी ८०० कोटी रुपये खर्चास मंजुरी मिळाली आहे. 

* हे विमानतळ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप पीपीपी तत्वावर उभारणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.