शनिवार, २६ मे, २०१८

देशात टेलिफोन वापरकर्ते १२०.६ कोटीवर - २६ मे २०१८

देशात टेलिफोन वापरकर्ते १२०.६ कोटीवर - २६ मे २०१८

* दूरसंचार नियामक ट्रायने दिलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी मार्च अखेरीस देशातील दूरध्वनी वापरकर्त्यांची संख्या १२० कोटीपेक्षा जास्त झाली आहे.

* फेब्रुवारीमध्ये ही संख्या ११७. ९८ कोटी इतकी होती. मार्चमध्ये टेलिफोन वापरकर्त्यांची संख्या पाहता ती मासिकस्तरावर २.२४% इतकी आहे.

* शहरी क्षेत्रात फेब्रुवारीमध्ये ६६.९६ कोटी इतके वापरकर्ते होते. ते मार्चमध्ये ६८.१६ कोटी इतके वाढले. तसेच ग्रामीण भागामध्ये फेब्रुवारीमध्ये ५१.२ कोटी इतके वापरकर्ते होते. त्यांच्यात वाढ होऊन ती संख्या ५२.०२ कोटी इतके वापरकर्ते त्यांच्यात वाढ होऊन ती संख्या ५२.४६ कोटी इतकी झाली.

* दूरसंचार क्षेत्रातील घनता फेब्रुवारीमध्ये ९० कोटीवरून ९३ कोटी इतकी झाली. वायरलेस वापरकर्ते म्हणजे जीएसएम, सीडीएमए व एलटीई फेब्रुवारीत ११५.६८ कोटी होते. असे ट्रायने  सांगितले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.