मंगळवार, २९ मे, २०१८

विराट कोहलीला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुरस्कार - २९ मे २०१८

विराट कोहलीला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुरस्कार - २९ मे २०१८

* टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला सिएट सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारावर कोहलीने तिसऱ्यांदा नाव कोरल आहे.

* यापूर्वी कोहलीने २०११-१२ आणि २०१३-१४ मध्येही हा पुरस्कार पटकावला होता. भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज फारुख इंजिनियर यांना सिएट क्रिकेट रेटिंग्जच्या पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले.

* भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि सिएटचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांच्या हस्ते इंजिनियर यांना गौरविण्यात आलं.

* टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने हा पुरस्कार स्वीकारला.

* शिखर धवनला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फलंदाज, तर न्यूझीलंडच्या ट्रेण्ड बोल्ट सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय गोलंदाज पुरस्काराचा मान देण्यात आला.

* तर वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला पॉप्युलर चाईल्ड अवॉर्ड हा पुरस्कार मिळाला आहे. न्यूझीलंडचा कोलिन मुनरो टी-२० चा सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे.

* तर अंडर १९ संघाचा क्रिकेटपटू शुभमन गिलला सर्वोत्तम अंडर १९ खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.