शनिवार, २८ एप्रिल, २०१८

UPSC २०१७ निकाल जाहीर अनुदीप देशात पहिला - २८ एप्रिल २०१८

UPSC २०१७ निकाल जाहीर अनुदीप देशात पहिला - २८ एप्रिल २०१८

* केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या युपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्राचा आलेख उंचावला आहे. युपीएससी परीक्षेत राज्यातून यश मिळवलेल्या उमेदवारांमध्ये यंदा वाढ झाली आहे.

* गेल्या वर्षी ९० विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविले होते. यंदा हा आकडा १०० हुन अधिक असण्याची शक्यता आहे.

* युपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी संध्याकाळी जाहीर झाला. उस्मानाबादमधील गिरीश बडोले याने देशात २० वा क्रमांक पटकावला आहे.

* देशभरातून पहिला येण्याचा मान हैद्राबाद येथील अनुदीप दुरीशेट्टी याने मिळविला आहे. त्या खालोखाल अनु कुमारी आणि सचिन गुप्ता यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.

* महाराष्ट्राच्या दृष्टीने समाधानाची बाब म्हणजे यूपीएससीत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थयांमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण वाढले आहे. गिरीश बडोले हा राज्यातून पहिला आला आहे.

* त्याच्या खालोखाल दिग्विजयय बोडखे याने केंद्रीय पातळीवरील या पात्रता परीक्षेत ५४ वा आला आहे. सुयश चव्हाण ५६, भुवनेश पाटील ५९, पियुष साळुंखे ६३, रोहन जोशी ६७, राहुल शिंदे ९५, मयूर काटवटे ९६, वैदेही खरे ९९, वल्लरी गायकवाड १३१, यतिश विजयराव देशमुख १५९, रोहन बापूराव घुगे २४९, श्रीनिवास वेंकटराव पाटील २७५, प्रतीक पाटील ३६६, विक्रांत सहदेव मोरे ४३०, तेजस नंदलाल पवार या परीक्षार्थीनी युपीएससीत यश मिळवले आहे.

* केंद्रीय लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबर २०१७ रोजी घेण्यात आली होती भारतीय प्रशासकीय सेवा IAS, भारतीय परदेश सेवा IFS, भारतीय पोलीस सेवा IPS, भारतीय वन सेवा IFS आणि केंद्रीय सेवा गट 'अ' आणि 'ब' करीता ही परीक्षा झाली होती.

* एकूण परीक्षार्थ्यांपैकी ९९० उमेदवार नियुक्तीकरिता पात्र ठरले आहे. तर १३२ उमेदवार प्रतीक्षा यादीवर असतील. एकूण जागांच्या १० टक्क्यापेक्षा जास्त महाराष्ट्रातील उमेदवार असावेत असे सांगितले जातात.

* पहिल्या शंभरातील उमेदवारांची संख्या गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत वाढली. २०१५-२०१७ या तिन्ही वर्षी साधारण पाच उमेदवार शंभरमध्ये होते. यंदा ते प्रमाण ९ ते १० पर्यंत पोहोचले आहेत.

* राज्यातील बहुतांश उमेदवार अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असून राज्यातील मुलीचे प्रमाण मात्र तुलनेने कमी आहे. मराठी माध्यमातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण घटले असून वयाने कमी असलेले उमेदवार अधिक आहे.

* पुन्हा परीक्षा देणाऱ्या उमेदवारापेक्षा, नव्याने परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण अधिक आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.