बुधवार, ४ एप्रिल, २०१८

UNSC ने सादर केली दहशदवादी संघटनांची यादी - ४ मार्च २०१८

UNSC ने सादर केली दहशदवादी संघटनांची यादी - ४ मार्च २०१८

* संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने UNSC [United Nations Security Council] आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांची यादी बुधवारी जाहीर केली.

* या यादीतील १३९ दहशतवादी हे पाकिस्तानमधील असल्याने पाकची नाचक्की झाली असून या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा समावेश आहे.

* संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने जाहीर केलेल्या यादीनुसार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमकडे असंख्य बनावट पासपोर्ट असून रावळपिंडी आणि कराचीतून हे पासपोर्ट जारी करण्यात आले होते.

* कराचीत दाऊदचा बंगला असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत १३९ जण पाकिस्तनचे आहेत.

* यात अलजवाहिरीचा नंबर पहिले लागला आहे. ओसामा बीन लादेनचा निकटवर्तीय असलेला अयमान अल-जवाहिरी अजूनही अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवर लपून बसल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.

* मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचाही या यादीत समावेश आहे. याशिवाय सईदच्या दहशतवादी संघटनेचाही या यादीत समावेश आहे.

* येमेनचा नागरिक आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी मोहम्मद बिन अल शेबाह याचादेखील समावेश आहे. याशिवाय लष्कर संबंधित अल मन्सुरीयन, पासबान-ए-काश्मीर, जमात उद दावा, फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन या संघटनांचाही दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.