गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

RBI चे आर्थिक द्विमासिक पतधोरण जाहीर - ५ एप्रिल २०१८

RBI चे आर्थिक द्विमासिक पतधोरण जाहीर - ५ एप्रिल २०१८

* रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चालू आर्थिक वर्षातील पहिले द्विमासिक पतधोरण आढावा जाहीर केले. आरबीआयने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 

* आरबीआयने रेपो रेट ६% तर रिव्हर्स रेपो रेट ५.७५% कायम ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या वाढत्या किमतीचे चलनवाढीच्या दृष्टीने होणारे परिणाम पाहता व्याजाचे दर कमी केली जाण्याची शक्यता कमी असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. 

* उद्योगक्षेत्राकडून व्याजदर कपातीची अपेक्षा केली जात होती. रिझर्व्ह बँकेने सलग चारवेळा व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या नेतृत्वात व्याज दर निश्चित करणाऱ्या ६ सदस्य असलेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

* रेपो रेट म्हणजे काय - रिझर्व्ह बँक अन्य व्यवसायिक बँकांना आर्थिक व्यवहारासाठी अल्पमुदतीचे कर्ज देते. ज्या व्याजदराने हे कर्ज दिले जाते त्याला रेपो रेट म्हणतात. 

* रेपो रेट कमी झाल्यास बँकांना कमी दरात हे कर्ज दिले जाते त्याला रेपो रेट म्हणतात. रेपो रेट कमी झाल्यास बँकांना कमी करात कर्ज मिळते. 

* बँकांनी तोच फायदा आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचविणे अपेक्षित असते. त्यामुळे ग्राहकांना कर्जावर भरावे लागणारे व्याजाचे दर कमी होतात. यालाच रिव्हर्स रेपो दर असे म्हणतात. 

* रिव्हर्स रेपो रेट म्हणजे आरबीआय अन्य बँकाकडून ज्या दराने पैसे घेतो तो दर. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.