शनिवार, ७ एप्रिल, २०१८

११ व्या IPL सिजन आजपासून सुरु - ७ एप्रिल २०१८

११ व्या IPL सिजन आजपासून सुरु - ७ एप्रिल २०१८

* आजपासून देशात ११ व्या आयपीएल सीझनच्या पर्वाला सुरुवात झाली असून यंदा ८ संघ असून त्यांच्यात एकूण ६० सामने होणार आहेत.

* यंदा या स्पर्धेत ८ संघ सहभागी होत असून, चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ दोन वर्षाच्या बंदीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहेत.

* यावर्षीपासून या स्पर्धेला मिळणारा क्रिकेट शौकिनांनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रयोजकाचा उत्साह आणि दूरदर्शनवरील थेट प्रक्षेपणामुळे प्रेक्षकांचा उत्साह वाढला आहे.

* या स्पर्धेतील अंतिम विजेता संघाला २५ कोटी रुपये मिळतील. उपविजेता संघ १२.५ कोटी रुपये. सर्वोत्तम खेळाडू १० लाख रुपये. प्रथमच डीआरएस पद्धतीचा या आयपीएलमध्ये वापर करण्यात केला आहे.

* आयपीएल विजेते संघ सालानुसार - २००८ राजस्थान रॉयल्स, २००९ डेक्कन चार्जर्स, २०१० चेन्नई सुपर किंग्स, २०११ चेन्नई सुपर किंग्स, २०१२ कोलकता नाईट रायडर्स, २०१३ मुंबई इंडियन्स, २०१४ कोलकाता नाईट रायडर्स, २०१५ मुंबई इंडियन्स, २०१६ सनरायजर्स हैद्राबाद, २०१७ मुंबई इंडियन्स. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.