सोमवार, २ एप्रिल, २०१८

फोर्ब्सच्या ३० अंडर ३० आशिया यादीत भारत प्रथम स्थानावर - २ एप्रिल २०१८

फोर्ब्सच्या ३० अंडर ३० आशिया यादीत भारत प्रथम स्थानावर - २ एप्रिल २०१८

* फोर्ब्सने आशियातील मनोरंजन आणि क्रीडाक्षेत्रातील नामवंतांची ३० अंडर ३० आशिया ही यादी जाहीर केली असून, त्यात या तिघीचा समावेश करण्यात आला आहे.

* भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, अभिनेत्री अनुष्का शर्मा, आणि महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना या तिघी फोर्ब्सच्या यादीत झळकल्या आहेत.

* या यादीत भारताच्या ६५ प्रतिभावंत यांना स्थान देण्यात आले आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या ५९ प्रतिभावंत या यादीत समावेश आहे.

* या यादीत इंडियन नॅशनल पोलो टीमचा कर्णधार पदमनाभ सिंह, अंकित प्रसाद, प्रिया प्रकाश, बाला सरदा, सुहानी जलोटा, राहुल जैन, श्रेयस भंडारी, रमेश धामी, आणि भूमिका अरोरा, आदी भारतीयांचा या यादीत समावेश केला आहे.

* कोणत्या देशाचे किती तरुण - भारत ६५, चीन ५९, ऑस्ट्रेलिया ३५, दक्षिण कोरिया २५, जपान २१, हॉंगकॉंग १२, पाकिस्तान ७ एवढ्या तरुणांचा समावेश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.