बुधवार, १८ एप्रिल, २०१८

फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांना पुलित्झर पुरस्कार प्रदान - १८ एप्रिल २०१८

फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी यांना पुलित्झर पुरस्कार प्रदान - १८ एप्रिल २०१८

* रॉयटर्स या वृत्तसंस्थेचे फोटो जर्नालिस्ट दानिश सिद्दीकी यांना त्यांच्या रोहिंग्या रेफ्यूजीच्या फोटोसाठी सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

* म्यानमारमधून बांगलादेश जाणाऱ्या रोहिंग्या विस्थापितांचे फोटो दानिश सिद्दीकी यांनी काढले आहेत. यापैकी एका फोटोत एक रोहिंग्या माणूस आपल्या मुलाला खेचून घेऊन चालला आहे, अशा आशयाचा एक फोटो आहे.

* दानिश सिद्दीकी यांनी काढलेल्या या फोटोला सर्वाधिक पसंती लाभली आहे. दानिश सिद्दिक्की यांचे सहकारी अदनान अबिदी यांनाही पुलित्झर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

* पत्रकारितेतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्काराची सुरुवात १९१७ मध्ये झाली. पुरस्कार विजेत्यांना १५ हजार अमेरिकी डॉलर्स आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.

* पत्रकारिता, साहित्य, संगीत रचना, वृत्तपत्रासाठीची पत्रकारिता, फोटोग्राफी या सर्वांसाठी हे पुरस्कार जिंकण्याचा बहुमान मिळाला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.