शनिवार, २१ एप्रिल, २०१८

२. जलसिंचनाची कामे व पद्धती

२. जलसिंचनाची कामे व पद्धती

जलसिंचनाचे महत्व

* पाणी हा शेतीसाठी अविभाज्य असा घटक आहे. पाण्याशिवाय शेती ही कल्पनाच करता येणार नाही. ज्या प्रदेशात भरपूर व वेळेवर पाऊस पडतो आणि त्याची विभागणी व्यवस्थित असते तेथे अन्य मार्गानी कुत्रीमरित्या पिकांना पाणीपुरवठा करण्याची जरुरी भासत नाही.

* तथापि ज्या प्रदेशात पर्जन्यमान कमी असते. पाऊस अनिश्चित स्वरूपाचा असतो. व त्याची विभागणीही व्यवस्थित नसते. अशा भागात शेतीसाठी पाणीपुरवठा करणे ही अत्यावश्यक बाब ठरते.

* ही गरज भागविण्यासाठी कुत्रिम साधनांनी पाणीपुरवठा करावा लागतो. ज्या प्रदेशात जलसिंचनाच्या सोयी सुविधा नसतात. पाण्यासाठी केवळ पावसावरच अवलंबून राहावे लागते.

* अशा प्रदेशात पाऊस पडल्यावर एखादेच पीक घेता येते. जलसिंचनाच्या अन्य सोई सुविधा उपलब्द नसल्याने दुसरे तिसरे पीक घेणे शक्य होत नाही.

* एक पीक घेतल्यावर उर्वरित आठ महिने जमीन रिकामी राहते. जमीन मर्यादित असल्याने ती पीक न घेता रिकामी  ठेवणे किफायतशीर नसते.

* त्यामुळे जलसिंचनाची कुत्रिम सुविधा वर्षभर पाण्याची आवश्यकता असते आणि ऊस, फळबागा, अशा महत्वाच्या पिकांना वर्षभर पाण्याची आवश्यकता असते आणि पिकांची लागवड विशिष्ट हवामानकाळात करणे गरजेचे असते.

* त्यामुळे हिवाळ्यात तसेच उन्हाळ्यात पाण्याची गरज भासते. ही गरज भागविण्यासाठी जलसिंचन सुविधा आवश्यक ठरते.

* उदाहणार्थ - बागायती कापूस, हळद, इत्यादी पिकांची लागवड उन्हाळा संपत येण्याच्या काळात केली असता. उत्पन्न चांगले येते. रोगराईचा उपद्रव कमी होतो. उन्हाळी भुईमुगाचे उत्पन्न खरीप भुईमुगापेक्षा अधिक येते.

* महाराष्ट्रात पश्चिम घाटासारख्या प्रदेशात मान्सूनचा पाऊस भरपूर पडतो. पण तो मोसमी असल्यामुळे सर्वसाधारणपणे एका खरीप पिकासच उपयोगी ठरतो.

* महाराष्ट्रातील बराच मोठा प्रदेश म्हणजे २२ जिल्ह्यातील मिळून - धुळे, अकोला, परभणी, व भंडारा या जिल्ह्याचे विभाजन झाल्यामुळे आता २६ जिल्ह्यामुळे आता १४८ गट अवर्षणग्रस्त म्हणून ठरविले गेले आहेत.

* या प्रदेशात पाऊस अपुरा व अनियमित पडतो. त्याची विभागणीही समान नसते, त्यामुळे अशा ठिकाणी शेतीचे आधुनिकीकरण करणे, निरनिराळ्या मार्गानी पाणीपुरवठा करणे पावसाचे पाणी जिरविणे जलसाठे तयार करणे, इत्यादी मार्गाचा अवलंब करणे आवश्यक असते.

[ महाराष्ट्र व भारत जलसिंचन क्षेत्राची तुलना]

* भारतातील एकूण जलसिंचन क्षेत्र व महाराष्ट्रातील एकूण जलसिंचित क्षेत्र यांची तुलना केल्यास महाराष्ट्र या बाबतीत नेमका कोठे आहे. हे कळून येते. ही तुलना मागील पानावर दिलेल्या तक्त्यामध्ये केलेली आहे.

* तुलनेसाठी उपलब्द असलेल्या सन २००७-२००८ मधील स्थितीनुसार भारतातील सिंचनाखालील एकूण क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा फक्त ४.६० टक्के इतकाच होता.

* भारतातील लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी ४४.९ टक्के क्षेत्र ओलिताखाली होते. तर महाराष्ट्रात हे प्रमाण १७.९० टक्के इतकेच होते.

* एवम भारताच्या तुलनेत महाराष्ट्रातील ओलिताखालील क्षेत्र अतिशय कमी आहे. जलसिंचनातील महाराष्ट्राचे मागासलेपण यावरून स्पष्ट होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.