गुरुवार, २६ एप्रिल, २०१८

राज्यात १ मे पासून ऑनलाईन सातबारा - २५ एप्रील २०१८

राज्यात १ मे पासून ऑनलाईन सातबारा - २५ एप्रील २०१८

* राज्यात येत्या एक मेपासून डिजिटल हस्ताक्षरासह ऑनलाईन सातबारा उपलब्द करून देण्यात येणार आहे. राज्यातील ४० हजार गावामधील शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ मिळेल. अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली.

* राज्यात गेल्या २००२ पासून ऑनलाईन सातबाराचे घोगडें भिजत पडले होते. शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा मिळाला, तरी त्यावर स्वाक्षरी असलेला ऑनलाईन सातबारा उतारा शेतकऱ्यांना उपलब्द होईल.

* येत्या एक ऑगस्टपर्यंत सातबारा उतारा निःशुल्क उपलब्द करून देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यातील सर्व ई-सेवा केंद्रामध्ये, तसेच स्वतःच्या संगणकावर १५ रुपये शुल्क भरून सातबारा उतारा घेता येईल.

* हा सातबारा उतारा शेतकऱ्यांना व्यवहारामध्ये वापरता येईल असे पाटील यांनी म्हटले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.