बुधवार, ११ एप्रिल, २०१८

देशातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिनचे लोकार्पण - ११ एप्रिल २०१८

देशातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिनचे लोकार्पण - ११ एप्रिल २०१८

* देशातील सर्वात शक्तिशाली रेल्वे इंजिन भारतीय रेल्वेत दाखल झाले असून, यामुळे देश आता चीन, जर्मनी, रशिया, आणि स्वीडन या देशांच्या रांगेत जाऊन बसला आहे. तब्बल १२ हजार अश्वशक्तीच्या या इंजिनामुळे रेल्वेगाड्या ताशी १२० किमी वेगाने धावू शकतील.

* महात्मा गांधींजींच्या नेतृत्वाखालील चंपारण्य सत्याग्रहाला १०० वर्षे झाल्याच्या निमित्ताने बिहार दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मधेपुरा येथील ग्रीनफिल्ड इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह कारखान्याच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले.

* या कारखान्यात तयार करण्यात आलेल्या देशाच्या पहिल्या १२ हजार अश्वशक्तीच्या इंजिनलाही मोदींना हिरवा झेंडा दाखविला. भारतीय रेल्वेत सध्या ६ हजार अश्वशक्तीचे इलेक्ट्रिक इंजिन कार्यरत आहेत.

* या नव्या इंजिनमुळे प्रवासी आणि मालवाहतुकीची क्षमता थेट दुप्पट झाली आहे. फ्रान्सच्या एल्सटॉम कंपनीच्या मदतीने या इलेक्ट्रिक हायस्पीड लोकोमोटिव्हची निर्मिती करण्यात आली आहे.

* या इंजिनमुळे ताशी १२० किमी वेगाने रेल्वे धावू शकेल. ६ हजार टन वजन खेचण्यात हे इंजिन सक्षम आहे. प्रामुख्याने मालवाहतुकीसाठी हे इंजिन वापरण्यात येईल. अशा प्रकारचे रेल्वे इंजिन वापरण्यात येईल. अशा प्रकारचे इंजिन आतापर्यंत केवळ रशिया, चीन, स्वीडन, आणि जर्मनी याच देशाकडे होते.

* भारतात मेक इन इंडियाअंतर्गत एल्सटॉम कंपनी पुढील ११ वर्षात असे ८०० इंजिन तयार करणार आहे. या इलेक्ट्रिक हायस्पीड लोकोमोटिव्ह प्रत्येकी अंदाजे २५ कोटी रुपये खर्च येतो.

* पर्यावरणाचा आणि भारतीय परिसथितीचा विचार करून तयार करण्यात आलेले हे इंजिन अत्यंत थंड आणि उष्ण वातावरणाताही कार्यरत राहू शकते.

* पुढील वर्षापर्यंत मधेपुरच्या कारखान्यात असे इंजिन तयार करण्यात येतील. याशिवाय मोदींनी कटिहार आणि दिल्लीदरम्यान धावणाऱ्या चंपारण्य एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. तसेच बिहारमध्ये रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची कोनशिला ठेवली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.