रविवार, ८ एप्रिल, २०१८

राष्ट्रकुल स्पर्धेत मनू भाकेर आणि हिना सिद्धूला सुवर्णपदक - ८ एप्रिल २०१८

राष्ट्रकुल स्पर्धेत मनू भाकेर आणि हिना सिद्धूला सुवर्णपदक - ८ एप्रिल २०१८

* भारताच्या नेमबाज मनू भाकेर आणि हिना सिद्धू यांनी एकाच वेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली आहे. महिलांच्या १० मीटर्स एअर पिस्टल प्रकारात दोघीनी अभिनास्पद कामगीरी बजावली.

* महिलांच्या १० मीटर्स एअर पिस्टल प्रकारच्या अंतिम फेरीत मनूने २४०.९ गुण कमवत सुवर्णपदकाला गवसणी घातली, हिना सिद्धूने २३४ गुणांची नोंद करत रौप्य पदक पटकावलं.

* त्यामुळे भारताला एकाच वेळी सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई करता आली. कौतुकाची बाब म्हणजे हरियाणाची मनू भाकेर अवघी १६ वर्षांची आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील पदार्पनातच तिने चमकदार कामगिरी केली.

* ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये २१ वी राष्ट्रकुल स्पर्धा सुरु आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने १० पदकाची कमाई केली आहे. त्यापैकी सात पदक वेटलिफ्टर्सनी पटकावली आहेत. भारताने आतापर्यंत ६ सुवर्ण, २ रौप्य आणि दोन कांस्य पदकाची कमाई केली.

* आतापर्यंत २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी
* मनू भाकेर - सुवर्ण पदक - नेमबाजी  महिला १० मीटर एअर पिस्टल
* हिना सिद्धू - रौप्य - नेमबाजी  महिला १० मीटर एअर पिस्टल
* रवी कुमार - कांस्य - नेमबाजी  पुरुष १० मीटर्स एकर रायफल
* पुनव यादव - सुवर्ण - वेटलिफ्टिंग - ६९ किलो वजनी गट
* आर वेंकट राहुल - सुवर्ण - वेटलिफ्टिंग पुरुष ८५ किलो वजनी गट
* सतीश शिवलिंगम - सुवर्ण - वेटलिफ्टिंग पुरुष ७७ किलो वजनी गट
* संजीता चानू - सुवर्ण -  वेटलिफ्टिंग पुरुष ५३ किलो वजनी गट
* मीराबाई चानू - सुवर्ण - वेटलिफ्टिंग पुरुष ४८ किलो वजनी गट
* गुरुराजा - रौप्य -  वेटलिफ्टिंग पुरुष ५६ किलो वजनी गट
* दीपक लाथर - कास्य -  वेटलिफ्टिंग पुरुष ६९ किलो वजनी गट

* मागील स्पर्धेत - २००२ मँचेस्टर ६९ पदके, २००६ मेलबर्न ५० पदके, २०१० दिल्ली १०१ पदक, २०१४ ग्लासगो ६४ पदक. आणि २०१८ सालच्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेसाठी सज्ज झालंय २२५ शिलेदाराच भारतीय पथक. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.