गुरुवार, २६ एप्रिल, २०१८

सहिष्णू देशांच्या यादीत भारत जगात ४ थ्या स्थानावर - २६ एप्रिल २०१८

सहिष्णू देशांच्या यादीत भारत जगात ४ थ्या स्थानावर - २६ एप्रिल २०१८

* बीबीसी साठी सर्वे करणाऱ्या [इसॉस मुरी] या संस्थेने हा अहवाल दिला आहे. सहिष्णुतेच्या बाबतीत कॅनडा, चीन, आणि मलेशिया फक्त भारताच्या पुढे आहेत.

* चिमुरडयांवर अत्याचार, अल्पसंख्यांकामधील वाढती नाराजी, पुरस्कार वापसी हे सगळं पाहिल्यावर आपल्या देशात काहीच धड सुरु नाही असा प्रश्न विचारला जातो. पण २७ देशांच्या यादीत सहिष्णुतेच्या बाबतीत भारत चक्क चौथ्या स्थानावर आहे.

* धक्कादायक म्हणजे चीन दुसऱ्या स्थानावर आहे. चीनमध्ये मुसलमानांवर अनेक निर्बंध आहेत. त्यांना रमजानचा सण साजरा करता येत नाही. रोजे ठेवता येत नाहीत.

* कामगार क्षेत्रात तर कोणतेही कायदे नसल्याची परिस्थिती आहे. फेसबुक, गुगल, यासारख्या वेबसाईट्स तिथे ब्लॉक करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच चीनचा या यादीतला दुसरा क्रमांक धक्कादायक ठरतो.

* सर्वेनुसार ६३ टक्के भारतीय नागरिक विविध संस्कृती, दृष्टिकोनाच्या बाबतीत प्रत्येकाचं वेगळं मत असल्याने ते भारताला सहिष्णू देश मानतात.

* राजकीय विचारातील मतभेद तणावाच कारण बनत असल्याचं ४९% जणांना वाटत असल्याच सर्वेमधून नमूद करण्यात आलं आहे.

* ४८ टक्के लोक धर्मालाही जबाबदार धरतात तर ३७% लोकांना सामाजिक-आर्थिक दरी तणावाचं कारण वाटते. हंगेरीमधील लोक त्यांच्या देशाला सर्वात कमी सहिष्णू देश मानतात. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो.

* भारताचं चित्र रंगवलं जात तेवढं ते निश्चितच वाईट नाही. आर्थिक किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतानं केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद असल्याचं अनेकांना वाटत. म्हणूनच इसॉस मुरीच्या या सर्वेवर ते विश्वास ठेवायला तयार आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.