सोमवार, ९ एप्रिल, २०१८

काही विशेष नवीन चालू घडामोडी - ९ एप्रिल २०१८

काही विशेष नवीन चालू घडामोडी - ९ एप्रिल २०१८

* खगोलशात्रज्ञानी आतापर्यंत पाहिलेला सर्वात दूरवरचा तारा शोधला आहे. हा तारा जवळजवळ संपूर्ण विश्वाच्या अर्ध्यापेक्षा अधिक अंतरावर असल्याचा अंदाज आहे. या ताऱ्याला इकरस असे नाव देण्यात आले.

* केंद्र सरकारने राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचे [नॅशनल टेस्टिंग एजन्सी] महासंचालक म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी विनीत जोशी यांची नियुक्ती केली आहे.

* नोबेल विजेते वैज्ञानिक कीप थॉर्न यांना विज्ञान प्रसारासाठी केलेल्या कार्यासाठी [लुईस थॉमस पारितोषिक २०१८ जाहीर करण्यात आले आहे.

* तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते सी व्ही राजेंद्रन यांचे १ एप्रिल २०१८ रोजी निधन झाले.

* मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदच्या मिल्ली मुस्लिम लीग (एमएमएल) या राजकीय पक्षाला अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

* दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांचे २ एप्रिल रोजी जोहान्सबर्गमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

* भारत-नेपाळमध्ये संरक्षण, व्यापाराच्या क्षेत्रात सहकार्य वाढीवर सहमती झाली आहे. त्यात व्यापार, संरक्षण, रेल्वे, पाणी संबंधी सहा करारावर स्वाक्षरी झाली आहे.

* भारत सरकाने ११० लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी अब्जावधी डॉलरच्या मेक इन इंडिया मोहिमेच्या दिशेने पहिले पाऊल ठेवले आहे.

* सेऊल-दक्षिण  कोरियाचे पहिल्या महिला माजी राष्ट्राध्यक्ष पार्क ग्युन हे यांना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठेवण्यात आले असून जिल्हा न्यायालयाने त्यांना २४ वर्षाची कैद ठोठावली आहे. पार्क यांच्यावर लाच घेणे, सत्तेचा दुरुपयोग करण्यासह भ्रष्टाचाराच्या १६ प्रकरणांचा ठपका होता.

* सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे तब्बल ३५ वर्षानंतर चित्रपटगृह पुन्हा सुरु होणार आहेत. १८ एप्रिल रोजी सिनेमागृह सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

* चेन्नईच्या भौगोलिक सांकेतांक नोंदणी कार्यालयाने [कडकनाथ] कोंबडीसाठी भौगोलिक सांकेतांक [Geographical Indication- GI] टॅग मध्यप्रदेशला मिळाला आहे.

* केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ [CBSC] चे माजी अध्यक्ष विनीत जोशी यांची राष्ट्रीय परीक्षा संस्था [National Testing Agency - NTA] चे पहिले महासंचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

* अमेरिकेची राजदूत रोझमेरी डिकार्लो यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या राजकीय व्यवहार विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

* [तीएनगोंग-१] नामक चीनची पहिली  प्रायोगिक अंतरळ प्रयोगशाळा पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेशले असून दक्षिण प्रशांत महासागर क्षेत्रात त्याचे अवशेष बहुतेक कोसळणार आहे. मात्र वातावरणातील घर्षणाने उत्पन्न होणाऱ्या उष्णतेमुळे हवेतच नष्ट झाल्याचे संकेत आहेत.

*
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.