मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

जगात सिंगापूर सर्वात महाग तर दमिश्क सर्वात स्वस्त शहर - ३ एप्रिल २०१८

जगात सिंगापूर सर्वात महाग तर दमिश्क सर्वात स्वस्त शहर - ३ एप्रिल २०१८

* जगभरात 'कॉस्ट ऑफ लिव्हीग २०१८' च्या सर्वेक्षणानुसार, दक्षिण आशियाई देश खासकरून भारत आणि पाकिस्तानातील शहर अधिक स्वस्त आहेत.

* जगातील सर्वात स्वस्त शहरामध्ये सीरियाची राजधानी असलेल्या दमिश्कचा प्रथम क्रमांक लागतो. तर सलग पाचव्या वर्षी जगातील सर्वात महागडे शहर म्हणून सिंगापूर या शहराचा क्रमांक लागतो.

* जगातील सर्वात स्वस्त शहरे अनुक्रमे - दमिश्क, कराकस, अल्माटा, लागोस, बंगळुरू, कराची, अल्जीअर्स, चेन्नई, बुखारेस्ट, नई दिल्ली.

* जगातील सर्वात महाग शहरे अनुक्रमे - सिंगापूर, पॅरिस, ज्युरींक, हॉंगकॉंग, ओस्ला, जिनिव्हा, सियोल, कोपनहेगन.

* सर्वात स्वस्त शहरांच्या यादीत टॉप १० शहरामध्ये भारतातील बंगळुरू, चेन्नई, दिल्ली यांचा समावेश आहे. या अहवालानुसार भारताचा वेगाने विस्तार होण्याचा होण्याची शक्यता आहे.

* परंतु प्रति व्यक्तीच्या हिशोबाने मात्र वेतन आणि खर्चात मात्र कमतरता राहील. असमान वेतनामुळे हा परिणाम वर्तविला जातो.

* या सर्व्हेमध्ये १६० उत्पादन सेवाची किमतीची तुलना केली जाते. यामध्ये खाद्यपदार्थ, पेय, कपडे, घरगुती सामान, घर भाडे, दळणवळण खर्च, युटिलिटी बिल, खाजगी शाळा, घरकामाला मदत अशी अनेक किमतीचा समावेश आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.