सोमवार, ३० एप्रिल, २०१८

डी. के. जैन राज्याचे नवीन मुख्य सचिव - ३० एप्रिल २०१८

डी. के. जैन राज्याचे नवीन मुख्य सचिव - ३० एप्रिल २०१८

* वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव सुमित मलिक हे आज सेवानिवृत्त होत आहेत.

* मुख्य सचिव पदासाठी डी के जैन आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांच्या नावाची चर्चा होती.

* सेवाज्येष्ठतेचा निकष हा गाडगीळ यांच्या बाजूने होता. जैन हे १९८३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते ३१ जानेवारी २०१९ ला सेवानिवृत्त होतील.

* कर्तबगार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून जैन यांची ओळख आहे. सौम्य प्रवृत्तीचे अधिकारी अशी मलिक यांची ख्याती आहे. राज्यातील निवडणुकांना अवघी २ वर्षे उरली आहेत.

* त्यामुळे सरकारच्या घोषणांची व निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून घेऊ शकेल, अशी व्यक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्य सचिवपदी हवी होती.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.