गुरुवार, १२ एप्रिल, २०१८

श्रेयासी सिंहला नेमबाजी डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक - १२ एप्रिल २०१८

श्रेयासी सिंहला नेमबाजी डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक - १२ एप्रिल २०१८

* श्रेयासी सिंहने राष्ट्रकुल क्रीडा नेमबाजीतील महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेतला. ऑलिम्पिक तसेच विश्वकरंडक स्पर्धेतून बाद झालेल्या या डबल ट्रॅप प्रकारात श्रेयासीने भारतास सुवर्ण जिंकून दिले. तर याच प्रकारात अंकुर मित्तलने ब्रॉंझपदक मिळवले.

* शॉट गन प्रकारात प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी श्रेयासी पहिलीच भारतीय महिला आहे. तिचे आणि ऑस्ट्रेलियाच्या एम्मा कॉक्स हिचे अंतिम फेरीत समान ९६ गुण झाले.

* शूटऑफ मध्ये श्रेयासीने २-१ अशी बाजी मारत सुवर्णपदक जिंकले. याच प्रकारात राजवर्धनसिंह राठोड यांनी अथेन्स ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते.

* श्रेयासीचे राष्ट्रकुल स्पर्धेतील हे पहिलेच पदक आहे. गतवर्षी तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. तर आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे पहिलेच सुवर्णपदक आहे.

* ओमप्रकाश मिथावल याने ५० मीटर पिस्तूल प्रकारात २०१.१ गुणांसह ब्राँझपदक जिंकले. पण आवडत्या या स्पर्धेत जितू राय आठवा आला.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.