सोमवार, १६ एप्रिल, २०१८

मुंबई ते दिल्ली नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे - १७ एप्रिल २०१८

मुंबई ते दिल्ली नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे - १७ एप्रिल २०१८

* केंद्रीय रास्तेवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राजधानी दिल्ली आणि मुंबईला जोडणारा नवीन एस्प्रेसवे पुढील ३ वर्षात बांधणार असल्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पासाठी १ लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. 

* दिल्ली-गुरुग्राम-मेवात-कोटा-अल्वर-सवाई माधोपूर बडोदाच्या मार्गे हा मुंबईपर्यंत एक्स्प्रेस वे असेल. हा एक्स्प्रेस वे झाल्यानंतर दिल्ली मुंबई या दोन्ही महानगरांमधील अंतर निम्म्यावर येणार आहे. 

* या प्रवासासाठी सध्या १४५० किमी अंतर कापावं लागतं पण एक्स्प्रेस-वे झाल्यानंतर हे अंतर १२५० किमी होणार आहे. त्यामुळे सध्या २४ तासांचा वेळ लागणारा हा प्रवास एक्स्प्रेस वे तयार झाल्यानंतर हे अंतर १२५० किमी होणार आहे. 

* त्यामुळे सध्या २४ तासांचा वेळ लागणारा हा प्रवास एक्स्प्रेस वेमुळे १२ तासावर येईल.तसेच चंबळ एक्सप्रेसवे तयार करून तो मुंबई ते दिल्ली एक्सप्रेसवेला जोडणार असल्याचे सांगण्यात आले. 

* हा मार्ग राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागाकडून जोडण्यात येईल. त्यामुळे अविकसित प्रदेशाचा निश्चित विकास होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.