रविवार, १ एप्रिल, २०१८

कान्स चित्रपट महोत्सवासाठी ३ मराठी चित्रपटाची निवड - १ एप्रिल २०१८

कान्स चित्रपट महोत्सवासाठी ३ मराठी चित्रपटाची निवड - १ एप्रिल २०१८

* मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्द व्हावी या हेतूने फ्रान्समध्ये दिनांक ८ मे ते १८ मे २०१८ या कालावधीसाठी होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राज्य शासनाकडून पाठविण्यात येणाऱ्या ३ चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

* निवड करण्यात आलेले चित्रपट पुढीलप्रमाणे - इडक, क्षितिज, आणि पळशीची पीटी या चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपट महोत्सवाच्या चित्रपटासाठी २६ मराठी चित्रपटांचे परीक्षण करण्यात आले.

* या २६ चित्रपटातून परीक्षण समितीने उपरोक्त ३ चित्रपटांची निवड कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सवासाठी केली आहे.

* सदर परीक्षण समितीमध्ये रघुवीर कुलकर्णी दिग्दर्शक, रेखा देशपांडे - चित्रपट समीक्षक, अरुणा जोगळेकर - पटकथाकार, प्रमोद पवार - लेखक अभिनेता, पुरुषोत्तम लेले - निर्माता दिग्दर्शक समितीने या ३ चित्रपटाची निवड केली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.