शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

मायक्रोसॉफ्ट इंडिया भारतीय कर्मचाऱ्यांची आवडती कंपनी - २७ एप्रिल २०१८

मायक्रोसॉफ्ट इंडिया भारतीय कर्मचाऱ्यांची आवडती कंपनी - २७ एप्रिल २०१८

* जगातल्या सर्वात चांगल्या कंपनीत आपल्याला नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आता चांगल्या कंपनीची व्याख्या व्यक्तीनुसार बदलते. पण त्यातही उत्तम पगाराबरोबरच जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळाव्यात अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा असते.

* यामध्ये सध्या सगळ्यात आघाडीवर कोणती कंपनी आहे. मायक्रोसॉफ्ट इंडिया ही कंपनी या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक आवडणारी कंपनी असल्याचे समोर आले आहे.

* रँडस्टॅंड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्चतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले असून अमेझॉन इंडिया ही कंपनी ही कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

* यानंतर हिंदुस्थान लिव्हर, आयबीएम इंडिया, आयटीसी ग्रुप, लार्सन अँड टर्बो, मर्सिडीज बेन्ज इंडिया, सॅमसंग इंडियन, सोनी इंडिया, आणि टाटा कन्सल्टनची सर्व्हिसेस या कंपन्यांनाचा क्रमांक लागतो.

* यामध्ये माहिती तंत्रज्ञानमध्ये टीसीएस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी असून लार्सन अँड टर्बो ही पायाभूत सोयीसुविधा आणि बांधकाम यासाठी आघाडीवर आहे.

* रॅंडस्टॅडचे व्यवस्थापकीय संचालक पॉल म्हणाले, कर्मचाऱ्यांना आपण कुठे काम करायचे याबद्दल आवडीनिवडी असतानाच पण त्याशिवाय किती क्षमता वापरून काम करायचे याबाबत आवडी निवडी असतात.

* यामध्ये आयटीक्षेत्राला ६९ टक्के ऑटोमोटिव्ह क्षेत्राला ६८ टक्के आणि रिटेल क्षेत्राला ६७ टक्के लोकांची पसंती असल्याचे समोर आले आहे. 

* भारतीय कर्मचारी नोकरी निवडताना पगाराबरोबरच कंपनीकडून मिळणाऱ्या सुविधांचाही विचार करतात असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

* त्यानंतर काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल, नोकरीची शाश्वती, करियरमध्ये होणारा फायदा आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल, नोकरीची शाश्वती, करियरमध्ये होणारा फायदा आणि सशक्त मॅनेजमेंट यांचा विचार कर्मचाऱ्याकडून केला जातो असाही निष्कर्स यामाधून समोर आला आहे.

* करियरमध्ये वृद्धी होत नसल्याने आम्ही नोकरी सोडतो असे ४३% कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचीही नोंद यामध्ये करण्यात आली आहे. या सर्वेक्षणासाठी ३० देशातील १ लाख ७५ हजाराहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.