बुधवार, ११ एप्रिल, २०१८

महाराष्ट्रातील प्रमुख पिके

महाराष्ट्रातील प्रमुख पिके

* जमिनीचा सर्वात मोठा वापर किंवा उपयोग म्हणजे पिकांची लागवड हा होय. भारतात तसेच महाराष्ट्रात विविध पिकांची लागवड केली जाते.

* पीक आराखडा म्हणजे एखाद्या प्रदेशातील एका कालखंडातील प्रत्येक पिकाखालील क्षेत्राचे प्रमाण होय. पिकांचे किंवा कृषिउत्पादने तृणधान्ये, कडधान्ये, गळीत धान्ये, नगदी पिके, फळपिके, भाजीपाला अशा प्रकारे वर्गीकरण केले जाते.

* क्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्रात कापूस हे महत्वाचे पीक आहे. जवळपास ४१.८७ लक्ष हेक्टर क्षेत्र या एकाच पिकाखाली आहे. त्याखालोखाल ज्वारी ३२.९० लक्ष हेक्टर, सोयाबीन ३०.६४ लक्ष हेक्टर व तांदूळ १५.५७ लक्ष हेक्टर ही पिके येतात.

* सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील काम करणाऱ्यांची एकूण संख्या ४ कोटी ९४ लाख इतकी होती. त्यापैकी ५२.७ टक्के कामकरी प्रत्यक्ष कृषी क्षेत्रात होते. कृषि क्षेत्रातील कामकऱ्यापैकी २५.४ टक्के शेतकरी तर २७.३ टक्के शेतमजूर होते.

* सन २००१-०२ व २०१२-१३ ची तुलना करता तांदळाखालील क्षेत्रात अगदी थोडीशी म्हणजे २.८४ टक्के इतकी वाढ झाली आहे. असे म्हणावे लागेल.

* गव्हाखालील क्षेत्रात १.१५ टक्के इतकी वाढ झाली आहे. ज्वारीखालील क्षेत्रात ३५.९५ टक्के इतकी घट झाली आहे. तर बाजरीखालील क्षेत्र ४३.६७ टक्क्यांनी घटले आहे.  तृणधान्याखालील एकूण क्षेत्राचा विचार करता त्यामध्ये २०.९४ टक्के इतकी घट झाल्याचे दिसून येते.

* महाराष्ट्रातील वनव्याप्त क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या १९.९४ टक्के आहे. जमीन वापरासंबंधीच्या माहितीत जमिनीचा वापर लक्षात घेऊन ते १६.४५ टक्के दिले आहेत. कारण काही वनक्षेत्र वापरानुसार चराऊ कुरणे व किरकोळ झाडा-झुडपातील क्षेत्रात धरले आहे.

* राज्यातील कडधान्यांचा विचार करता तूरीखालील क्षेत्रात १९.३७ टक्के इतकी वाढ झाली असल्याचे दिसून येते. हरभऱ्याखालील क्षेत्रात ५०.१३ टक्के इतकी भरीव वाढ झाली आहे.

* मुगाखालील क्षेत्रात ३९.६३ टक्के इतकी घट झाली आहे.  उडिदाखालील क्षेत्रातही ३७.२८ घट घडून आली आहे. कडधान्य पिकांचा एकत्रित विचार करता कडधान्याखालील एकूण क्षेत्रात १.९४ टक्के इतकी नगण्य घट झाली.

* महाराष्ट्रात अन्नधान्य पिकात सर्वात अधिक उत्पादन तांदळाचे आहे. त्याखालोखाल ज्वारी व गहू या पिकांचा क्रम लागतो. गव्हाखालोखाल बाजरी हे राज्यातील महत्वाचे पीक आहे.

* जेथे एक गोष्ट लक्षात घेण्याजोगे आहे की राज्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र अधिक असले तरी मात्र खरीप ज्वारीचे जास्त आहे.

* भारतातील इतर प्रगत राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील हेक्टरी उत्पादन बऱ्याच पिकाबाबत फारच कमी आहे. तांदळाचे हेक्टरी उत्पादन पंजाब व आंध्रप्रदेशात अनुक्रमे ३,१८१ किलो व २,५२४ किलो आहे.

* ज्वारीचे उत्पादन कर्नाटकात हेक्टरी १,३०० किलोपेक्षा जास्त आहे. गुजरातमध्ये बाजरीचे हेक्टरी उत्पादन १,४०० किलोहून अधिक आहे.

[देशातील पिकांची हेक्टरी उत्पादकता]

प्रमुख पिके                देशातील उत्पादकता [हेक्टर]               महाराष्ट्रातील उत्पादकता [हेक्टर]
  तांदूळ                                   २,४६२                                           १,९६३
   गहू                                      ३,११७                                           १,५२७
  ज्वारी                                    ८५०                                              ६४१
  बाजरी                                   १,१९८                                           ६३७
 हरभरा                                   १,०३६                                            ७६५
  तूर                                        ७७६                                               ८२९
भुईमूग                                    ९९५                                              १,०५५
 ऊस                                        ७०,०००                                         ८३,०००
कापूस                                     ४८६                                               २७६

[भारत कृषिउत्पादकता]

* इतर देशांशी तुलना करता अनेक पिकांची दर हेक्टरी उत्पादकता देशात कमी असल्याचे दिसुन येते. तथापि अलीकडच्या काळात अनेक पिकांच्या बाबतीत अधिक उत्पन्न देणाऱ्या व संकरित जातीच्या बियाण्यांचा वापर  उत्पादन वाढ घडवून आणली गेली आहे.

* सन १९५०-५१ शी तुलना करता भाताच्या उत्पादनात तिपटीहून अधिक, तर गव्हाच्या उत्पादनात जवळजवळ अकरापट वाढ घडवून आणण्यात आली आहे.

* याच कालावधीत ज्वारीच्या उत्पादनात दीडपटीहून अधिक, तर बाजरीच्या उत्पादनात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. मक्याचे उत्पादन सहा पटीने, तर भुईमुगाचे उत्पादनात तिपटीने वाढले आहे.

* असे जरी असले तरी वस्तुस्थितीचा अधिक बारकाईने अभ्यास केला असता आणि तुलनेसाठी आपल्या हाती असलेल्या सन २००९-१० ते २०११-१२ या तीन वर्षातील सरासरीचा विचार केला असता असे दिसून येते की.

* भारताची तांदुळाची उत्पादनक्षमता दरहेक्टरी ४,००० ते ५,८०० कि ग्रॅ इतकी असली तरी भारतातील तांदुळाचे दरहेक्टरी उत्पादन ३,५१४ कि ग्रॅ इतकेच आहे.

* हेच उत्पादन भारत - उत्पादनात अग्रेसर असलेल्या चीनमध्ये उत्पादनक्षमता दरहेक्टरी ६,००० ते ६,८०० कि ग्रॅ इतकी असली तरी भारतातील गव्हाचे उत्पादन प्रत्यक्षात हेक्टरी ३,००० कि ग्रॅ इतकेच आहे.

* हेच उत्पादन गव्हाचे सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या ब्रिटनमध्ये विक्रमी ७,३६० कि ग्रॅ इतके असून ते जागतीक स्तरावर ३,०९४ कि ग्रॅ एवढे आहे.

* मक्याचे प्रतिहेक्टरी ६,००० ते ८,००० कि ग्रॅ इतके मक्याचे उत्पादन करण्याची आपली क्षमता असली तरी आपल्या देशातील मक्याचे उत्पादन अवघे हेक्टरी २,३२१ एवढे आहे.

* हेच उत्पादन मक्याच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या अमेरिकेत हेक्टरी ८,८५८ कि ग्रॅ इतके असून. जागतिक स्तरावर हेक्टरी ५,०९७ कि ग्रॅ इतके आहे.

* भारतातील उसाचे उत्पादन साधारणतः हेक्टरी ६९२ क्विंटल इतके आहे. जागतिक स्तरावर उसाचे उत्पादन हेक्टरी ७०४ क्विंटल इतके असून उसाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या पेरूमध्ये १,२५६ क्विंटल इतके आहे.

* हेक्टरी २००० ते ३००० कि ग्रॅ इतके भुईमुगाचे उत्पादन करण्याची आपली क्षमता असली तरी प्रत्यक्षात आपण हेक्टरी १,२१२ कि ग्रॅ इतकेच भुईमुगाचे उत्पादन घेतो.

* हेच उत्पादन भुईमुगाच्या हेक्टरी उत्पादनात जगात अग्रेसर असलेल्या अमेरिकेमध्ये हेक्टरी ४,०६९ कि ग्रॅइतके आहे. जागतिक स्तरावर हेच प्रमाण १,६२६ कि ग्रॅ तर कापसाचे ७६९ कि ग्रॅ इतके आहे.

* हेक्टरी १५ ते २० क्विंटल कापसाचे उत्पादन करण्याची आपली क्षमता असली तरी आपण प्रत्यक्षात हेक्टरी ५१७ कि ग्रॅ इतकेच कापसाचे उत्पादन घेतो.

* तर कापसाचे सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या ऑस्ट्रेलियात हेक्टरी १,९२० कि ग्रॅ इतके आहे. इतर पिकांच्या बाबतीतही हीच स्थिती कमी अधिक फरकाने आढळते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.