शनिवार, २८ एप्रिल, २०१८

भारतात थेट विक्री उद्योगात महाराष्ट्र प्रथम - २८ एप्रिल २०१८

भारतात थेट विक्री उद्योगात महाराष्ट्र प्रथम - २८ एप्रिल २०१८

* भारतातील थेट विक्री उद्योगात २०१६-१७ मध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून, गुजरात सहाव्या स्थानावर आहे. देशातील थेट विक्री उद्योगात महाराष्ट्राचा वाटा १२.८९ टक्के असून त्यापाठोपाठ पश्चिम बंगाल, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो.

* ६.९९ टक्के वाटा असलेला गुजरात सहाव्या क्रमांकावर आहे. भारतीय थेट विक्री उद्योग संघटनेचा [आयडीएसए] २०१६-१७ चा वार्षिक पाहणी अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

* देशातील थेट विक्री उद्योगात एकट्या पश्चिम विभागाचा वाटा २४.६ टक्के आहे. पश्चिम विभागातही महाराष्ट्राने ५२.३% सर्वोत्तम कामगिरी  नोंदविली आहे.

* ऍम्वे, ओरिफ्लेम आणि टपरवेअर अशा कंपन्यांना या उद्योगात समावेश होतो. या उद्योगामध्ये २०१६ ते १७ मध्ये दहा हजार ३२४ कोटी रुपयाची विक्री केली आहे.

* भारतातील थेट विक्री उद्योग - महाराष्ट्र १२. ८९, पं बंगाल ९.१०, तामिळनाडू ८.८३, कर्नाटक ७.८१, उत्तर प्रदेश ७.३६, गुजरात - ६.९९ एवढे आहे.

  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.