रविवार, १५ एप्रिल, २०१८

राष्ट्रकुल स्पर्धेत भारत तिसऱ्या स्थानावर - १५ एप्रिल २०१८

राष्ट्रकुल स्पर्धेत भारत तिसऱ्या स्थानावर - १५ एप्रिल २०१८

* नो नीडल पॉलिसी पथकातील पालकांचा समावेश अशा वादाच्या घटना बाजूला ठेवत भारतीय क्रीडापटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे मैदान गाजवून २६ सुवर्ण, २० रौप्य, २० ब्रॉन्झ अशा ६६ पदकासह पदकतक्त्यात तिसरे स्थान पटकावले.

* २०१४ च्या ग्लासगो स्पर्धेतील ६४ पदक संख्येत भारताची दोनची भर घातली. राष्ट्रकुल स्पर्धेतील ही कामगिरी तिसऱ्या क्रमांकाचीचा ठरली.

* यापूर्वी भारताने दिल्ली येथील स्पर्धेत १०१ आणि २००२ मँचेस्टर स्पर्धेत ६१ पदकांची कमाई केली होती. या स्पर्धेत यजमान ऑसट्रेलियाने १९८ पदकासह अव्वल, तर इंग्लंड १३६ पदकासह सुरवात आणि अखेर रौप्यपदकानेच झाली.

* भारताने या स्पर्धेत १६ नेमबाजी, ९ बॉक्सिंग, ३ ऍथलेटिक्स, १२ कुस्ती, ८ टेबल टेनिस, २ स्क्वाश, ९ वेटलिफ्टिंग, ६ बॅडमिंटन, १ पॅराऑलिम्पिक मध्ये पदके जिंकली.

* या सामन्याचे उदघाटन सोहळ्यात पी व्ही सिंधूने भारतीय पथकाचे नेतृत्व केले होते. समारोप सोहळ्यात हा मान राष्ट्रकुल सुवर्णपदकाचे स्वप्न साकार करणाऱ्या बॉक्सिंग खेळाडू मेरी कोमला देण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.