रविवार, ८ एप्रिल, २०१८

आता रक्तचाचणीद्वारे स्मृतीभंश रोगाचे निदान - ८ एप्रिल २०१८

आता रक्तचाचणीद्वारे स्मृतीभंश रोगाचे निदान - ८ एप्रिल २०१८

* संशोधकानी नवीन रक्तचाचणी विकसित केली असून यामुळे स्मृतीभंश असणाऱ्या रुग्णामध्ये या आजाराचे निदान लवकर होत असल्याचे होत आढळून आले आहे.

* या चाचणीमुळे या संदर्भातील नवीन औषधाच्या निर्मितीसाठी चालना मिळण्याची शक्यता असल्याचे जर्मनीतील हूर विद्यापीठांनी संशोधकांनी सांगितले.

* स्मृतीभंश झालेल्या रुग्णाच्या मेंदूमध्ये लक्षणांच्या सुरवातीला अमायलॉइड बीटाचा थर जमा होण्यास सुरुवात होते. रक्ताच्या चाचणीमध्ये इम्युनो इन्फ्रारेड सेन्सर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अमायलॉइड बीटा थराचा आकार आणि त्याची रचना समजून घेतली जाते.

* या चाचणीमुळे स्मृतीभंश आजाराचे निदान लवकर होत असल्याचे दिसून येते, असे मॉलिक्युअर सेल नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे.

* निरोगी व्यक्तीच्या मेंदूतील अमायलॉइड बीटाचा थर पातळ असतो. तर स्मृतीभंश झालेल्या व्यक्तीच्या मेंदूमधील अमायलॉइड बीटाचा थर जाड आणि चिकट असतो.

* त्यामुळे तो वेगळा ओळखता येतो आणि निदान करता येते. या दोन्ही प्रकारचे थर अवरक्त किरण वेगवेगळ्या प्रकारे शोषून घेतात. ही बाब रोगनिदानासाठी उपयोगी ठरते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.