रविवार, २९ एप्रिल, २०१८

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी कायमची रद्द - २९ एप्रिल २०१८

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी कायमची रद्द - २९ एप्रिल २०१८

* आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी कायमची रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२१ साली भारतात होणारी वन डे सामन्यांची चॅम्पियन्स ट्रॉफी कायमची रद्द करून आयसीसीन त्याऐवजी २०-२० विश्वचषकाच आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

* त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी २०-२० विश्वचषक पाहायला मिळेल. त्यामुळे आता २०-२० साली ऑस्ट्रेलियात आणि २०२१ साली भारतात लागोपाठ दोन २०-२० विश्वचषकाच आयोजन येईल.

* आयसीसी बोर्डाची ५ दिवसीय बैठक कोलकात्यात पार पडली. या बैठकीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितलं की, आयसीसीने सर्वानुमते २०२१ मध्ये भारतात होणारी चॅम्पियन ट्रॉफी रद्द करण्याचा निर्णय घेतला.

* २०१७ मध्ये झालेल्या शेवटच्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पाकिस्तानने भारताचा दारुण पराभव केला होता. आता ही ट्रॉफी बंद होणार आहे.

* सुरवातीला भारताने या निर्णयाला विरोध केला होता. मात्र नंतर बीसीसीआयचे प्रतिनिधी अमिताभ चौधरी यांनी समर्थन केलं.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.