बुधवार, ११ एप्रिल, २०१८

नॅसकॉमच्या अध्यक्षपदी रिशाद प्रेमजी यांची निवड - ११ एप्रिल २०१८

नॅसकॉमच्या अध्यक्षपदी रिशाद प्रेमजी यांची निवड - ११ एप्रिल २०१८

* माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅसकॉम या संघटनेच्या अध्यक्षपदी विप्रोचे मुख्य धोरणात्मक अधिकारी रिशाद प्रेमजी यांची निवड २०१८-१९ सालासाठी करण्यात आली आहे.

* WNS समूहाचे मुख्याधिकारी केशव मुरुगेश यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. प्रेमजी हे नॅसकॉमच्या कार्यकारी मंडळाचे सध्या सदस्य असून, २०१७-१८ सालात त्यांनी संघटनेचे उपाध्यक्षपदही भूषविले आहे.

* ते विद्यमान अध्यक्ष रमण रॉय यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारतील. भारतीय माहिती तंत्रज्ञान प्रतिभांचा जागतिक मुक्त संचाराला चालना, परदेशात नोकरीतील इमिग्रेशन अडसरांना दूर करण्यासाठी पाठपुरावा आणि उद्योगाच्या नव्या भौगोलिक क्षेत्रात तसेच ज्ञान क्षेत्रात विस्ताराला प्रोत्साहन या मुख्य कार्यक्षेत्रावर आपला भर राहील असे प्रेमजी म्हणाले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.