शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

योजना - सुकन्या समृद्धी योजना

योजना - सुकन्या समृद्धी योजना

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी २०१५ च्या सुरवातीपासून सुकन्या समृद्ध योजना जाहीर केली. बेटी बचाओ बेटी पढाओ नारा केवळ बोलणे नसून खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्याची तरतूद होत असल्याने मुलीचे भविष्य उज्वल करणे पालकांच्या हातात आहे.

* सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत आपल्या वय वर्षे १० पर्यंतच्या मुलीच्या नावाने त्यांचे पालक खाते काढून एक अप्रतिम भेट मुलींना देऊ शकतात.

* इतर खात्यापेक्षा या खात्याला व्याजदर जास्त ८.१ टक्के आहे. आणि यातील गुंतवणूक ही आयकर कलम ८० नुसार करमुक्त आहे.

* त्याचेच आकर्षण अनेक पालकांना यामध्ये गुंतवणूक करायला लावेल. तसेच या खात्यातून मिळणारा परतावासुद्धा करमुक्त आहे हे विशेष आहे.

* सुरवातीला १००० रुपये भरून, आणि प्रतिवर्षी किमान तितकेच पैसे १४ वर्षे तरी भरावेच लागतील. १४ वर्षाचा लॉक इन कालावधी या खात्याला आहे.

* देशभरातील पोस्ट ऑफिस अथवा राष्ट्रीय बँक यामध्ये खाते खोलता येते. एका आर्थिक वर्षात १००० ते १,५०,००० पर्यंत गुंतवणूक करता येते. कमीत कमी रक्कम जर भरली नाही तर मात्र ५० रुपये दंडात्मक भरावे लागतात.

* मुलगी १० वर्षाची झाल्यावर ती आपले खाते आपण स्वतः चालवू शकते. तोपर्यंत तिचे आईवडील खाते बघतील. बहुतेक सर्वच बँकामध्ये १० वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याला स्वतःचे खाते काढता येते.

* जर कोणास दोन मुली असतील, तर ते पालक दोन्ही मुलींच्या नावाने वेगवेगळे खाते काढता येते. जर कोणास दोन मुली असतील.

* तर ते पालक दोन्ही मुलीच्या नावाने वेगवेगळे खाते काढून दोन्हीकडे दीड लाख भरू शकतात. परंतु त्यापैकी एकाच खात्यातील इन्व्हेस्टमेंटवर त्यांना करसवलत घेता येते. संपूर्ण देशभरात एका गावातून दुसऱ्या गावी खाते ट्रान्सफर करता येईल.

* मग ते खाते बँकेत असो, अथवा पोस्टात असो. मुलगी वय वर्षे १८ होईपर्यंत खात्यातील शिलकीच्या फक्त रक्कम केवळ तिच्यात शिक्षण खर्चासाठी काढता येते.

* इतर खर्चासाठी पैसे काढता येणार नाहीत. जेव्हा ते कन्यारत्न २१ वर्षाचे होईल. तेव्हा ते खातेसुद्धा तिच्यासारखेच परिपकव मॅच्युवर होते.

* खाते उघडल्यावर २१ वर्षे पूर्ण होतील तो दिवस, किंवा तिच्या लग्नाची तारीख यापैकी जो दिवस आधी येईल. त्या दिवशी सुकन्या समृद्धी योजना खात्याची मुदत संपेल आणि परिपकव रक्कम मुलीला काढता येईल.

* इतरत्र केलेली गुंतवणूक उदा. मुदत बँक ठेवी, शेअर्स, लोक भविष्य निधी, म्युच्युअल फंड, रियल इस्टेट, पेन्शन योजना या व इतर सर्व योजनांमध्ये मिळणारा परतावा मुद्दलासह कुठेही, कुठल्याही कारणासाठी वापरायची मुभा खातेदारास आहे.

* मिळणारी रक्कम, धंदा, घर, शेती, वाहन, व इतरत्र तो वापरू शकतो पण सुकन्या योजनेत नाही. फक्त आणि फक्त मुलीसाठीचे खाते आहे. सुकन्या खात्यातील रकमेला  विशेष उद्दिष्ट दिलेले आहे.

* ती रक्कम मुलीचे शिक्षण आणि लग्न याचसाठी खर्च करावयाची असल्याने तिला इतरत्र फाटे नकोत. आजची १० वर्षापेक्षा लहान मुलगी अजून ११ वर्षांनी २१ वर्षाची झाल्यावर तिला पैशाची उत्तम जाण आलेली असेल आणि ती मिळालेले पैसे इतरत्र वापरू देणार नाही.

* स्त्री वर्गाला योजनेद्वारे दिलासा दिलेला आहे. गरज आहे ती तमाम पुरुष वर्गाची आणि महिलांचीसुद्धा मुली व स्त्रिया यांच्याप्रती मानसिकता बदलायची. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.