रविवार, २२ एप्रिल, २०१८

सुखी-समृद्धी आयुष्यासाठी जगात फ्रान्स सर्वोत्तम - २२ एप्रिल २०१८

सुखी-समृद्धी आयुष्यासाठी जगात फ्रान्स सर्वोत्तम - २२ एप्रिल २०१८

* आर्थिक सामर्थ्यासह मानवी विकास, शांतता, स्थैर्य, अशा सर्वच बाबींचा विचार केल्यास कोणत्या देशाचे नागरिक म्हणून तुम्ही जगात सर्वाधिक सुखी-समाधानी आयुष्य जगू शकता. याबाबत सर्वेक्षण केले असता फ्रांस हा देश जगात सर्वोत्तम ठरला आहे.

* जगातील १६८ देशांच्या या यादीत मध्यम दर्जाच्या राष्ट्रीयत्वाची ओळख बाळगत भारत १०६ व्या स्थानी आहे. तर निकृष्ट दर्जाच्या नागरिकत्वाचा ठपका बसलेला पाकिस्तान १५९ व्या क्रमांकावर आहे.

* हेन्री अँड पार्टनर्स नामक एका संस्थेने क्वालिटी ऑफ नॅशनॅलिटी इंडेक्स अर्थात राष्ट्रीयत्वाच्या दर्जाबाबतची एक यादी तयार केली आहे.

* हि यादी तयार करताना संबंधित देशाचे नागरिक म्हणून तुमचा होणारा मानवी विकास, तुम्हाला लाभणारी आर्थिक समृद्धी, शांतता, स्थैर्य, त्या देशाचे नागरिक म्हणून तुम्हाला व्हिसामुक्त प्रवासाची असलेली सवलत, देशात कुठेही स्थिरस्थावर होण्याच्या असलेल्या संधी आणि परदेशात जाऊन काम करण्याचे उपलब्द पर्याय यांचा अभ्यास करण्यात आला.

* या प्रत्येक मुद्याचे वर्गीकरण करून ठराविक गुण देण्यात आले. आणि त्यानुसार एक नागरिक म्ह्णून तुमच्या सर्वागीण विकासासाठी तुमचा देश किती दर्जेदार आहे. हे ठरविण्यात आले.

* या यादीत सर्वाधिक ८१.७% गुण मिळवून फ्रांस जगात सर्वोत्तम ठरला आहे. म्हणजेच फ्रेंच नागरिकत्व असलेल्या व्यक्तीला त्याच्या देशात तर विकासाच्या अनेक संधी उपलब्द असतातच, याशिवाय परदेशातही त्याला मानाचे स्थान असते.

* गेली ७ वर्षे या यादीत अव्वल स्थानी असलेला जर्मनी यंदा ८१.६% गुणांसह दुसऱ्या स्थानी घसरला आहे. आइसलँड आणि डेन्मार्क या यादीत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. जगातील आर्थिक महासत्ता असलेला अमेरिका या यादीत २७ व्या क्रमांकावर आहे.

* या अहवालात क्वालिटी ऑफ नॅशनॅलिटी इंडेक्स तयार करताना राष्ट्रयत्वाची दर्जाची सर्वाधिक उच्च दर्जा, अतिउच्च दर्जा, उच्च दर्जा, मध्यम दर्जा, आणि निकृष्ट दर्जा अशी वर्गवारी करण्यात आली आहे.

* भारताचा मध्यम दर्जाच्या राष्ट्रांमध्ये समावेश असून १६८ देशांच्या या यादीत १०६ व्या क्रमांकावर आहे. शेजारील चीन या यादीत ५९ व्या तर पाकिस्तान १५९ व्या स्थानी आहे.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.