शनिवार, २८ एप्रिल, २०१८

सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू - २८ एप्रिल २०१८

सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू - २८ एप्रिल २०१८

* प्रशासनाच्या गोंधळामुळे वादात सापडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुहास पेडणेकर यांची निवड झाली आहे.

* अमेरिकेतील स्टीव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी येथे ग्रीन केमिस्ट्री या विषयात डॉ पेडणेकर यांनी पी. एचडी मिळवली आहे.

* राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नल्समधून त्यांचे ३१ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना २०१२ मध्ये राज्य सरकारने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले होते.

* डॉ सुहास पेडणेकर हे अमेरिकन केमिकल सोसायटी, इंडियन सायन्स काँग्रेस, इंडियन केमिकल सोसायटी, विज्ञानभारती आदी संस्थांचे पदाधिकारी आहेत.

* नीती आयोग, विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता आयोग नॅक तसेच केंद्र व राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विविध उच्च शिक्षण समित्यांमध्ये सदस्य आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.