शनिवार, ७ एप्रिल, २०१८

पुण्याच्या एम्सला राष्ट्रीय दर्जा देण्यास मान्यता - ७ एप्रिल २०१८

पुण्याच्या एम्सला राष्ट्रीय दर्जा देण्यास मान्यता - ७ एप्रिल २०१८

* भारतातील एकमेव असलेल्या पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयास आता इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा मिळणार आहे.

* यापूर्वी दिल्लीतील एम्सला हा दर्जा मिळालेला आहे. हा दर्जा मिळाल्यानंतर या महाविद्यालयाला संशोधनासाठी सुमारे ३०० कोटी रुपये उपलब्द होऊ शकते.

* पुण्यात १९६२ मध्ये हे महाविद्यालय स्थापन झाले. महाविद्यालयाची गुणवत्ता आणि गरजासंबंधी एक सादरीकरण संरक्षणविषयक स्थायी समितीपुढे करण्यात आले होते.

* लष्करी वैद्यकीय महाविद्यालयास दिल्लीतील एम्सच्या धर्तीवर त्यास राष्ट्रीय दर्जा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. अशी शिफारस समितीने केली आहे.

* संसद कायद्यानुसार या महाविद्यालयास इन्स्टिटयुट ऑफ नॅशनल इन्स्टिट्यूटचा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल. असे उत्तर केंद्र सरकारने दिले आहे. असा दर्जा मिळणारी ही भारतातील तिसरी संस्था ठरेल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.