शनिवार, ७ एप्रिल, २०१८

कॉमनवेल्थ गेममध्ये भारताचे दुसरे सुवर्ण - ७ एप्रिल २०१८

कॉमनवेल्थ गेममध्ये भारताचे दुसरे सुवर्ण - ७ एप्रिल २०१८

* सलग दुसऱ्या दिवशी भारताला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदकाची भेट मिळाली. या दिवशी मणिपूरच्या संजीता चानू हिने ५३ किलो वजनी गटात हि कामगिरी केली. पुरुष विभागात दीपक लाठर ब्राँझपदकाचा मानकरी ठरला.

* याच केंद्रावर गेल्या वर्षी संजीताने राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. सहकारी मीराबाई हिच्याप्रमाणे तिने या वेळी स्नॅच मधील राष्ट्रकुल स्पर्धा विक्रमाची नोंद केली.

* पुण्यात एसपीटी [आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट] येथे ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण घेता घेता वेटलिफ्टिंगचे रस घेणाऱ्या हरियाणाच्या दीपक लाठारने १८ व्या वर्षीच राष्ट्रकुल स्पर्धेच्या पदार्पणातच ६९ किलो वजनी गटात ब्राँझपदकाची कमाई केली आहे.

* दोन वर्षांपूर्वी दिपकने सामोआ येथील युवा राष्ट्रकुल स्पर्धेच्या पदार्पणातच ६९ किलो वजनी गटात ब्राँझपदकाची कमाई केली.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.