गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

सरासरी

सरासरी

* नमुना प्रश्न - चार क्रमवार सम संख्यांची सरासरी ३५ आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
१] ३२ २] ३० ३] ३४ ४] २८
उत्तर - १] ३२ - समजा सरासरी संख्या ही क्रमवार संख्यांच्या मधली संख्या असते. जसे ३२, ३४, ३५, ३६, ३७.

* नमुना प्रश्न - क्रमशः १ ते २० अंकांची सरासरी ही क्रमशः १ ते १० अंकाच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे.
१] १०.५ २] १० ३] ५.५ ४] ५
उत्तर = ४] ५ क्रमशः असलेल्या अंकांची सरासरी = [पहिली संख्या + शेवटची संख्या ÷ २] या सूत्रानुसार   १+२०/२ = १०.५ १+१०/२=५.५ यावरून १०.५ - ५.५ = ५

* नमुना प्रश्न - क्रमशः १ ते १०० अंकाची बेरीज किती?
१] ५०५० २] १००५० ३] १०१०० ४] २५२५
उत्तर - क्रमशः संख्यांची बेरीज = सरासरी × एकूण संख्या = १+१००/२×१०० किंवा १०१×१००/२=१०१×५०=५०५०.

* नमुना प्रश्न - ३५, ३९, ४५, ३६ आणि ४* या दोन अंकी संख्यांची सरासरी ३९ आहे. तर शेवटच्या संख्येतील एकक स्थानचा * च्या जागेवरील अंक कोणता?
१] ३ २] ५ ३] ० ४] ७   उत्तर = ३] ०
समजा - सरासरी ३९
३५+३९+४५+३६=१५५
एकूण = ३९×५=१९५ एककस्थानी ५ येण्यास ५ + ९ + ५ + ६ + * = २५ म्हणून ० + ५ = ५ म्हणून * च्या जागी = ० येईल.

* नमुना प्रश्न - क्रमशः पाच विषम संख्यांची सरासरी ३७ आहे. त्यापुढील ५ विषम संख्यांची सरासरी ४७ आहे. तर त्या दहाही संख्यांची सरासरी किती?
१] ४४ २] ४३ ३] ४२ ४] ४०
उत्तर - एकूण संख्यांची सरासरी = सरासरींची बेरीज / (N) एकूण संख्या  = ३७ + ४७ / २ = ८४ / २ = ४२.

* नमुना प्रश्न - एका नावेत सरासरी २२ कि ग्रॅ वजनाची २५ मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन २४ कि ग्रॅ झाले तर नावाड्याचे वजन किती?
१] ७४ कि ग्रॅ २] ७१ कि ग्रॅ ३] ७५ कि ग्रॅ ४] १०० कि ग्रॅ

* नमुना प्रश्न - एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी १५ वर्षे आहे. त्यापैकी १५ मुलांच्या वयांची सरासरी १२ वर्षे झाले. व उरलेल्या मुलांची सरासरी १६ वर्षे आहे. तर त्या वर्गात एकूण मुले किती?
१] ६० २] ४५ ३] ४० ४] ५०  उत्तर = १] ६०
स्पष्टीकरण = १५ मुलांच्या संख्यांची सरासरी एकूण मुलांच्या सरासरी पेक्षा ३ ने कमी व उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी १ ने जास्त आहे. एकूण भरून काढवयाची वर्षे = ३×१५ विद्यार्थी = ४५ वर्षे.
उरलेल्या विद्यार्थ्यांपैकी १ विद्यार्थी १ वर्ष भरून काढतो.
उरलेले विद्यार्थी = १ × ४५ = ४५ विद्यार्थी,  म्हणून = ४५ + १५ = ६० विद्यार्थी.

* नमुना सातवा = एका दुकानदाराची ३० दिवसांनी सरासरी विक्री १५५ रु आहे, पहिल्या १५ दिवसाची विक्री १९० रू असल्यास, नंतरच्या १५ दिवसांनी एकूण विक्री किती?
१] २८५ २] २३७५ ३] १८०० ४] १९५० उत्तर = ३] १८००
स्पष्टीकरण = (१५५ - सरासरीतील फरक) × १५ = (१५५ - ३५) × १५ = १२० × १५ = १८००

* नमुना प्रश्न - ताशी सरासरी ६० किमी वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते. जर ती ताशी सरासरी ५० किमी वेगाने गेल्यास ती निर्धारित वेळेपेक्षा ३० मिनिटे उशिरा पोहोचते. तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती?
१] ३०० किमी २] १५० किमी ३] ४५० किमी ४] यापैकी नाही   उत्तर = २] १५० किमी
स्पष्टीकरण = एकूण अंतर X मानू,
म्हणून X/५०-X/६०=३०/६०.     ६X-५X/३००= १/२      X=३००/२=१५० किमी.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.