शनिवार, २१ एप्रिल, २०१८

भारतात दर १५ मिनिटात एक अत्याचार क्राय संस्थेचा अहवाल - २१ एप्रिल २०१८

भारतात दर १५ मिनिटात एक अत्याचार क्राय संस्थेचा अहवाल - २१ एप्रिल २०१८

* भारताला दर १५ मिनिटांनी एका बालकावर लैंगिक अत्याचार होतो. तसेच अल्पवयीन मुलाविरोधातील गुन्ह्यात गेल्या दहा वर्षात तब्बल ५०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे धक्कादायक निष्कर्ष मुलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या 'चाईल्ड राईट्स अँड यु' क्राय या बिगर सामाजिक संघटनेने या विषयावर केलेल्या सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहेत.

* बलात्कारासारख्या घृणास्पद कृत्यांनी सध्या भारतातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच क्राय ने नोंदविलेले निष्कर्स तर सामान्यांनी मती गोठविणारे आहेत.

* मुलाविरुद्धच्या गुन्ह्यापैकीं ५०% गुन्हे उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, दिल्ली, व पश्चिम बंगाल या राज्यामध्ये नोंदविलेले आहेत.

* बालगुन्हेगारीत दहा वर्षात ५०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१६ मध्ये एक लाख सहा हजार ९५८ गुन्ह्याची नोंद झाली आहे. २००६ मध्ये ही संख्या १८ हजार ९६७ होती. असे या अहवालात म्हटले आहे.

* बाल लैंगिक अत्याचार प्रतिबिंब कायद्याच्या पॉस्को २०१६ मधील विश्लेषणानुसार भारतात मुलावरील गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे.

* यावरून दर १५ मिनिटांनी एका अत्याचार होत असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे. उत्तर प्रदेशात मुलाविरोधातील गुन्ह्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.