बुधवार, ४ एप्रिल, २०१८

व्यवहारी अपूर्णांक

व्यवहारी अपूर्णांक

* पुढील व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकातील रूपांतर तोंडपाठ पाहिजेच.
१] १/२=०.५
२] १/३=०.०३
३] १/४=०.२५
४] १/५=०.२
५] २/३=०.६६
६] ३/४=०.७५
७] ३/५=०.६
८] ४/५=०.८
९] १/८=०.१२५
१०] ५/८=०.६२५
११] ७/८=०.८७५

* नमुना पहिला ६/७, ३/४, ४/५, २/३ यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? उत्तर = २/३ नियम- छेदाधिक अपूर्णांकात अंश व छेद यांच्यात १ चा फरक अथवा समान फरक असेल तर, ज्यांचा अंश छेद अंशाधिक अपूर्णांक असेल तर तर त्याच्या उलट नियम वापरा.

* खालील सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
 १] ७/२ २] १६/५ ३] १९/६ ४] २२/७ उत्तर = २२/७
नियम - वरील अपूर्णांकाचे पूर्णाकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केल्यास प्रत्येकाचा ३ पूर्णांक येतो. व बाकी अनुक्रमे १/२, १/५, १/६, १/७ उरते. अंश समान असल्यास ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान व ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. या नियमानुसार सोडवा.

* ३/४, २/३, ५/६, १/२, ४/५ यांचा उतरता क्रम लावल्यास, बरोबर मधला अपूर्णांक तो कोणता? उत्तर ३/४.
नियम - छेदादिक अपूर्णांकात अंश व छेदात १ चा फरक असून ज्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असतो.

* १/४, १/३, ३/५, ७/८, ५/९ यांचा उतरता क्रम लावल्यास, बरोबर मधला अपूर्णांक कोणता? उत्तर = ५/९.

* खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? ५/९, ३/५, ७/१३, ९/१७ उत्तर - ९/१७.
नियम - दिलेल्या अपूर्णकात प्रत्येक अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा १ ने कमी असेल तर ज्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक लहान आणि ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो.

* खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? ५/११, ३/७, ७/१५, ९/१९
नियम - दिलेल्या अपूर्णकात प्रत्येक अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा १ ने जास्त असेल तर ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक लहान आणि ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.