शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

देशातील क्रिकेट प्रक्षेपण हक्क स्टारकडे - ६ एप्रिल २०१८

देशातील क्रिकेट प्रक्षेपण हक्क स्टारकडे - ६ एप्रिल २०१८

* देशातील सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रक्षेपणावर स्टार स्पोर्ट्सने आपली मक्तेदारी दाखवली आहे. काही महिन्यापूर्वी आयपीएलचे हक्क १६,३४७ कोटींना मिळणाऱ्या या कंपनीने रिलायन्स जियो आणि सोनी नेटवर्क यांचे तगडे आवाहन मोडले आहेत.

* पुढील पाच वर्षांत देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे हक्क ६,१३८.१ कोटींना मिळवले आहेत. देशांतर्गत सामान्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क वितरणासाठी बीसीसीआयने प्रथमच ई-लिलाव पद्धतीचा अवलंब केला होता.

* यामध्ये टीव्ही आणि डिजिटल प्रसारणाचा समावेश आहे. क्रिकेटविश्वातील सर्वात श्रीमंत असलेल्या बीसीसीआयच्या या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

* पुढील ५ वर्षात भारतात १०२ आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. याअगोदरचे हक्कही स्टारकडे होते.स्टारने २०१२ मध्ये ९६ सामन्यासाठी ३८५१ कोटी मोजले आहेत.

* त्यावेळी सोनीशी स्पर्धा होते. सोनीने ३७०० कोटीपर्यंत बोली लावली जाते. पुढील ५ वर्षात १०२ आंतरराष्ट्रीय सामने आहेत.

* एका सामन्यासाठी ६० कोटी १० लाख मोजणार आहेत. आयपीएलसाठी एका सामन्यासाठी मोजत आहेत ५५ कोटी. सॊनीकडे आता इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, आणि द आफ्रिकेतील प्रसारणाचे हक्क. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.