शनिवार, १४ एप्रिल, २०१८

भुईमूग

भुईमूग

* हवामान - या पिकास उष्ण हवामान मानवते. ६० ते ७० सेमी पाऊस पुरेसा होतो. हवामानानुसार महाराष्ट्रात भुईमूग लागवडीचे दोन भाग पडतात.

* नैऋत्य मोसमी पावसाचा प्रदेश - यात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अकोला, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, हे जिल्हे येतात. या भागाचे पर्जन्यमान ४५ ते ८७ सेमी आहे. जून जुलै मध्ये पावसाची सुरुवात होते.  सप्टेंबरमध्ये पाऊस थांबतो. त्यामुळे या भागात भुईमूग-लागवडीसाठी ९० ते १०५ दिवसात तयार होणाऱ्या जातींचा वापर करावा.

* नैऋत्य व ईशान्य मोसमी पावसाचा प्रदेश - यात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर तसेच औरंगाबाद वगळता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याचा समावेश होतो. या भागात जून ते नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडतो. त्यामुळे येथे १२५ ते १३० दिवसात तयार होणाऱ्या निमपसऱ्या व पसऱ्या जातीचा भुईमूग घेतात.

* जमीन - मध्यम, चांगल्या निचऱ्याची मऊ, भुसभुशीत व सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन या पिकास अधिक उपयुक्त ठरते.

* पूर्वमशागत - एक नांगरट व कुळवाच्या दोन पाळ्या आवश्यक. १२-१५ गाड्या शेणखत गरजेचे.

* पेरणी - जूनचा दुसरा पंधरवाडा किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमिनीत ओल असताना पेरणी केली जाते. उपट्या जातीची पेरणी ३० सेमी अंतराच्या पाभरीने, तर पसऱ्या जातीची पेरणी ४५ सेमी अंतराच्या  करतात.

* बियाणे व वाण - एसबी ११ ही भुईमुगाची उपटी जात आहे. तिचे बियाणे हेक्टरी १०० किलो या प्रमाणात वापरतात. ही जात १०५ ते ११० दिवसात तयार होते. दुसरी लोकप्रिय उपटी जात म्हणजे [फुले प्रगती] या जातीचे बियाणे हेक्टरी १२० ते १२५ किलो इतके आवश्यक असते.

* खते - पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागासाठी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद देण्याची शिफारस तर विदर्भ व धुळे, नंदुरबार, व जळगाव या जिल्ह्यामध्ये हेक्टरी २५ ते ५० किलो स्फुरद योग्य ठरते.

* भुईमुगावरील रोग - पाने गुंडाळणारी अळी, मावा तुडतुडे, फुलकिडे, हुमणी हे रोग आढळतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.