शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

जलसिंचन व भू-विकास कार्यक्रम

जलसिंचन व भू-विकास कार्यक्रम

* लाभक्षेत्र विकास कार्यक्रम - हा कार्यक्रम केंद्रपुरस्कृत असून या कार्यक्रमाचा अंमलबजावणी केंद्रातून ५० टक्के साहाय्य मिळते. राज्यस्तर लाभक्षेत्र विकास संघटना, क्षेत्रस्तरावर विभागीय मंडळ व एक वा अधिक मोठ्या पाटबंधारे प्रकल्पासाठी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अशी कार्यक्रमाच्या अमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेली संघटना आहे.

* राष्ट्रीय पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रम - ७ व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात हा कार्यक्रम ५०% केंद्रपुरस्कृत कार्यक्रम म्हणून राज्यात कार्यंवित होता. परंतु आठव्या पंचवार्षिक योजनेपासून हा कार्यक्रम १०० टक्के केंद्रपुरस्कृत म्ह्णून राबविला जात आहे.

* खार-भूमी-विकास कार्यक्रम - राज्यातील किनारपट्टीलगतच्या कोकण विभागात १९४९ पासून हा कार्यक्रम राबविला जात आहे. समुद्राचे खारे लगतच्या शेतजमीन शिरू न देणे, त्याचप्रमाणे पावसाचे जास्तीत जास्त पाणी अडवून ते समुद्रात जाऊ नये या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

* जल व भूमी व्यवस्थापन संस्था, औरंगाबाद - या संस्थेचे इंग्रजी नाव [Water And Land Management Institute] असे असून तिचा संक्षिप्त उल्लेख [WALMI] असा केला जातो. ही संस्था १९८०-८१ मध्ये सुरु झाली. जमीन आणि पाणी यांच्या विकासासाठी तसेच त्यांचा सुयोग्य वापर केला जावा यासाठी प्रशिक्षण देण्याचे कार्य ही संस्था करते.

* महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, औरंगाबाद - या संस्थेचे इंग्रजी नामाभिधान [Maharashtra Engineering Research Institute] MERI असे आहे. ही संस्था नाशिक येथे १९५९ साली स्थापन करण्यात आली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.