शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

भारतातील हरितक्रांती

भारतातील हरितक्रांती

* भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि पूर्वी या क्षेत्रात तो संपन्न असा देश होता. तथापि, या देशाच्या अन्नधान्य आघाडीवर मोठे गंडांतर आले ते १९४३ मधील बंगालच्या दुष्काळाने.

* त्यानंतर १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला आणि भारताची फाळणीही झाली. या फाळणीमुळे भारताच्या वाट्याला अखंड भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८२% लोकसंख्या आली.

* मात्र एकूण तृणधान्याखालील क्षेत्रापैकी फक्त ७५ टक्के क्षेत्र आणि  बागायत क्षेत्रापैकी फक्त ६९ टक्के क्षेत्र आले. त्यामुळे अन्नधान्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला.

* या काळात व नंतरही आपल्याला अन्नधान्याची आयात करावी लागली. ही आयात सुरवातीचा एक प्रयत्न म्हणजे 'अधिक धान्य पिकवा मोहीम' पंचवार्षिक योजना सुरु झाल्यानंतरही प्रत्येक सुरूच होते.

* यातील सुरवातीचा एक प्रयत्न म्हणजे 'अधिक धान्य पिकवा मोहीम' पंचवार्षिक योजना झाल्यानंतरही प्रत्येक योजनेत शेती व पाणीपुरवठा या बाबींना प्राधान्य देण्यात आले.

* १९६०-६१ मध्ये शासनाने 'सघन शेती जिल्हा कार्यक्रम' हा एक पथदर्शी प्रकल्प हाती घेतला. त्याचबरोबर अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांचा कार्यक्रम यांची भर पडली.

* या प्रकल्पात उत्पादन वाढीचे भरगोस यश दिसून आले. त्यामुळे हे नवीन तंत्र किंवा व्यूह संपूर्ण भारताला लागू करण्यात आली.

* यामुळे १९६५ नंतरच्या काळात अन्नधान्य उत्पादनाच्या वाढीत परिवेधन दृष्टिक्षेपांत आले. यालाच आपण Green Revolution असे म्हणतो. तसेच बियाणे-खते-जलसिंचन-तंत्रज्ञान यामुळे हे घडून आले. यालाच आधुनिक शेतीतंत्रशास्त्र असेही संबोधिले जाते.

* शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानामुळे सुधारित वाणांच्या बियाणांखालील क्षेत्र जे १९७०-७१ मध्ये फक्त १५ दशलक्ष हेक्टर होते. ते १९८९-९० मध्ये ६४ दशलक्ष हेक्टर पर्यंत वाढले.

* हे नवीन वाण कमी कालावधीत तयार होणारे असल्याने अनेक बागायत क्षेत्रात एकामागोमाग दोन किंवा तीन पिके घेता येणे शक्य आहे.

* हरितक्रांतीच्या सुरवातीच्या काळात पंजाब, हरियाणा, राजस्थान, व उत्तर प्रदेश क्षेत्रातील पश्चिम भागात शेतकऱ्यांनी अभूतपूर्व उत्साह दाखवून गहुपिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ घडवून आणणे.

* भातपिकाच्या बाबतीत तितकी लक्षणीय वाढ लगेच घडून आली नाही. तथापि काही चांगल्या नवीन वाणामुळे नंतरच्या काळात उत्पादनात खूप वाढ झाली.

* सन १९६५-६६ मध्ये अन्नधान्य पिकांच्या संकरित वाणांचे आगमन झाले आणि वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागविली जाण्याची शक्यता निर्माण झाली.

* भारतातील अन्नधान्य उत्पादन १९६२-६३ मध्ये फक्त ८०.१ दशलक्ष टन होते. त्यात महाराष्ट्राचा वाटा फक्त ६.७ दशलक्ष टन इतका होता.

* संकरित बियाणांचा वापर व त्याचबरोबर रासायनिक खते, पाणीपुरवठा, पीकसंरक्षण इत्यादींतील प्रगत ज्ञानाच्या साहाय्याने १९८०-८१ मध्ये भारतातील अन्नधान्याचे उत्पादन १३३ दशलक्ष टनापर्यंत पोहोचले. तर महाराष्ट्रातील उत्पादन ९.४७ दशलक्ष टनापर्यंत वाढले.

[महाराष्ट्राचे जलसिंचन हरित क्रांतीशी निगडित]

* हरितक्रांतीतील जलसिंचन महत्व यात खूप आहे. अधिक उत्पन्न देणारी बियाणी, रासायनिक खते याबरोबरच पाणीपुरवठा हीसुद्धा महत्वाची बाब आहे. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्र जलसिंचन सुविधांमध्ये लक्षात घेण्याजोगी वाढ झाली आहे.

* तथापि, भारतातील प्रगत राज्याच्या तुलनेने महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्र बरेच कमी आहे. दुसरी बाब म्हणजे सुरवातीपासून तुलनात्मकदृष्ट्या इतर साधनांनी भिजणाऱ्या क्षेत्रापेक्षा विहिरीखाली भिजणारे क्षेत्र राज्यात अधिक आहे.

* सन २०१४ मधील उपलब्द माहितीनुसार राज्यातील ओलिताखालील निव्वळ क्षेत्रापैकी ६५ टक्के क्षेत्र विहिरीद्वारे भिजविले जाते. तर ३५ टक्के क्षेत्र इतर माध्यमाद्वारे भिजविले जाते.

* राज्यातील स्थूल सिंचित क्षेत्र सन १९६०-६१ मध्ये फक्त १२ लक्ष २० हजार हेक्टर्स होते. ते २००९-१० मध्ये ४० लाख ५० हजार हेक्टर्सवर तर जून २०११ पर्यंत ४८ लक्ष २५ हजार हेक्टर्सवर पोहोचले.

* म्हणजेच या कालावधीत सिंचित क्षेत्र जवळपास चार पटींनी वाढले. दुबार बागायत क्षेत्रातही या कालावधीत लक्षणीय वाढ झाल्याचे दृष्टोत्पत्तीस येते.

* हरितक्रांतीला हातभार लावणारा आधुनिक तंत्रज्ञानातील आणखी एक घटक म्हणजे पीकसंरक्षण उपाययोजना. संकरित पिकांच्या बाबतीत किडी व रोगापासून बचाव करणे ही अत्यावश्यक बा

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.