शनिवार, १४ एप्रिल, २०१८

राष्ट्रकुल स्पर्धेत मेरी कॉम व तेजस्विनी सावंतला सुवर्णपदक - १४ एप्रिल २०१८

राष्ट्रकुल स्पर्धेत मेरी कॉम व तेजस्विनी सावंतला सुवर्णपदक - १४ एप्रिल २०१८

* ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल खेळामध्ये भारतीय बॉक्सर मेरी कॉम ने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. बॉक्सिंगमधल भारताच हे पाहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.

* मेरीच राष्ट्रकुल स्पर्धांमधील हे पाहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. काल भारतीय बॉक्सर्सनी कास्यपदकांची कमाई केल्यानंतर मेरी कोमने सुवर्णपदक मिळवत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक टाकलं आहे.

* ऑस्ट्रेलयातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पर्धेतलं तेजस्विनीच हे पाहिलं सुवर्णपदक ठरलं आहे.

* राष्ट्रकुल स्पर्धामध्ये ५० मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात विक्रमी गुणांची नोंद करत तेजस्विनीने पदकांच्या शर्यतीत भारताचं तिसरं स्थान कायम राखलं आहे.

* तेजस्विनीने ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली होती. तेजस्विनी सावंत व्यतिरिक्त भारताच्या अंजुम मुद्गिलने रौप्यपदकाची कमाई केली.

* अंजुमने ४५५.७ गुण करत भारताला रौप्यपदकाची कमाई करून दिली. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचं तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणाऱ्या तेजस्विनीने प्राथमिक फेरीतली सर्वोत्तम कामगिरी बजावत अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क होत.

* त्यामुळे वेटलिफ्टिंग, कुस्ती, पाठोपाठ नेमबाजीत भरतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करत पदकांची लयलूट सुरु ठेवली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.