शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात ५ वर्षाची शिक्षा - ६ एप्रिल २०१८

सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात ५ वर्षाची शिक्षा - ६ एप्रिल २०१८

* ऑक्टोबर १९९८ मध्ये दोन काळवीटाना ठार मारल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयाने आज चित्रपट अभिनेता सलमान खान पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर सलमानची जोधपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

* न्यायालयाने सलमानचे सहकारी सैफअली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे आणि एक स्थानिक व्यक्ती दुष्यंत सिंह यांना संशयितांचा फायदा मिळाल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली.

* प्रकरण - 'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान १ ऑक्टोबर १९९८ च्या रात्री जोधपूरजवळील कानकानी गावात सलमानने दोन काळविटांची शिकार केली होती. त्याच्यासोबत सैफ अली खान, तब्बू, नीलम, आणि सोनाली बेंद्रे हे कलाकारही होते.

* गोळीचा आवाज एकूण ग्रामस्थ घटनास्थळी आले. तेव्हा सलमानने इतर कलाकारांसोबत गाडीतून पळ काढला. तर दोन्ही हरणांचे मृतदेह तिथेच पडून होते. याप्रकरणी सलमान दोषी ठरला आहे.

* दरम्यान कोर्टानं शिक्षा सुनावण्याआधी जेव्हा सलमान आणि इतर आरोपीना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली. तेव्हा सर्वानीच आपल्यावरचे आरोप नाकारले होते.

* आपण काळविटाची शिकार केली नाही. त्यात आपला कुठलाही हात नाही, असं म्हटलं होत. मात्र कोर्टानं त्यानंतर सलमान दोषी ठरवत असल्याच जाहीर केलं. तर आरोपीना केवळ पुराव्याआधी निर्दोष सोडलं.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.