शनिवार, २८ एप्रिल, २०१८

भारतामध्ये महिलांची कमाई पुरुषापेक्षा १६.१% कमी - २८ एप्रिल २०१८

भारतामध्ये महिलांची कमाई पुरुषापेक्षा १६.१% कमी - २८ एप्रिल २०१८

* भारतामध्ये महिलांची कमाई पुरुषापेक्षा १६.१% कमी आहे. भारतात महिलांना पुरुषापेक्षा जवळपास १६.१% कमी वेतन दिल जात. याशिवाय भारतासह जगभरामध्ये नोकरीच्या ठिकाणी लिंगभेद अद्यापही सुरूच आहे.

* कॉर्न फेरी जेंडर पे इंडेक्सच्या अहवालातून याबाबत माहिती समोर आली आहे.  जागतिक स्तराचा विचार केला असता तेथेही महिलांची स्थिती सारखीच आहे.

* जागतिक स्तरावरही पुरुषापेक्षा जवळपास १६.१ टक्के कमी वेतन महिलांना कमी दिल जात. एकाच कंपनीमध्ये समकक्ष काम करणाऱ्या पुरुष आणि महिलेच्या वेतनातील फरक दीड टक्क्यांनी कमी आहे.

* तर सारखेच काम करणाऱ्यांमध्ये हे अंतर केवळ ०.५ टक्क्यांनी कमी होत आहे. भारतामध्ये एकाच पातळीवर काम करणाऱ्या महिला व पुरुषाच्या वेतनामधील अंतर चार टक्के आहे.

* तर एकसारखेच काम, जबाबदारी हाताळणाऱ्या कंपनीमध्ये हेच अंतर ०.४ टक्क्यांनी कमी आहे. कॉर्न फेरी जेंडर पे इंडेक्सतर्फे, ५३ देशातील १४ हजार कंपन्यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

* यामध्ये जवळपास १२.३ दशलक्ष कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा समावेश आहे. काही कंपन्यांमध्ये महिलांना सरासरीपेक्षा कमी वेतन दिले जाते.

* एकाच पदावरील कर्मचाऱ्यांचा अभ्यास केल्यास हा आकडा कमी होत असल्याने कॉर्न फेरीचे मुख्य अधिकारी बॉब यांनी सांगितले.

* भारतातील वेतन लिंगभेद हा शेजारच्या चीनपेक्षाही जास्त आहे. चीनचा १२.१ टक्के आहे. तर ब्राझीलसारख्या देशामध्ये हाच आकडा २६.२ म्हणजेच सर्वाधिक आहे. फ्रान्समध्ये १४.१, जर्मनी १६.८, युकेमध्ये २३.८, अमेरिकेमध्ये १७.६ आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.