सोमवार, २ एप्रिल, २०१८

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिला सक्षमा केंद्रांची स्थापना - २ एप्रिल २०१८

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिला सक्षमा  केंद्रांची स्थापना - २ एप्रिल २०१८

* महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्यातील महापालिका, नगरपालिका,जिल्हा परिषदा, व पंचायत समिती यामध्ये सक्षमा केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

* महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्थानीक स्वराज्य संस्थांनी केंद्र [जेंडर रिसोर्सेस सेंटर] उभारावे. त्यास सक्षमा कक्षा असे नाव देता येईल. असे महिला आयोगाने म्हटले आहे.

* राज्यातील महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ, विभागीय आयुक्त यांनी या संसाधन केंद्राची अंमलबजाणी करण्यात यावी अशी सूचना करण्यात आली.

* स्थानिक स्वराज्य संस्थानी आपापल्या शहरामध्ये स्त्री संसाधन केंद्र उभारून महिलांच्या अडचणी सोडवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून, त्यांच्यातील कौशल्याला वाव देणारी एक सक्षम यंत्रणा उभी करावी.

* महिलाविषयक कायद्याचे मार्गदर्शन, समुपदेशन या केंद्रामार्फत केले जावे. केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थेने महिलांसाठी आखलेल्या योजनांची माहिती देणारा कक्ष या केंद्रात असावा.

* तसेच महिलाच्या कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन, असे कार्यक्रम राबविण्यात यावे. यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी अशी सूचना करण्यात आली आहे.

* केंद्रासाठी तरतुदीची सूचना - महापालिका 'अ' वर्ग १ कोटी रुपये, ब वर्ग ५० लाख, क वर्ग ३५ लाख, ड वर्ग २५ लाख. नगरपालिका - अ वर्ग १० लाख, ब वर्ग ५ लाख, क वर्ग २ लाख. प्रत्येक जिल्हा परिषद १५ लाख रुपये. पंचायत समिती ५ लाख. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.