सोमवार, १६ एप्रिल, २०१८

कापूस

कापूस

* कापूस हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे नगदी पीक आहे. राज्यातील बरेच मोठे क्षेत्र जिरायत कपाशीखाली आहे. तर काही क्षेत्र बागायती कपाशीसाठी प्रसिद्ध आहे.

* कापसाचा प्रमुख प्रदेश - जिरायत कापूस - विदर्भातील अकोला, यवतमाळ, वाशीम, अमरावती, बुलढाणा, वर्धा, नागपूर, हे जिल्हे. मराठवाड्यातील सर्वच जिल्हे, धुळे नंदुरबार व जळगाव जिल्हे. बागायती प्रदेश - पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिण कालव्याखाली येणारा पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, व सांगली, जिल्ह्यातील भाग, तसेच नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामधील पाण्याची सोय असलेला भाग.

* पाऊस - ६५० ते ७५० मीमी योग्य रीतीने विभागून मिळाल्यास तो पुरेसा होतो.

* हवामान - बियाणाच्या चांगल्या उगवणीसाठी कमीत कमी १५% से ग्रे तापमान लागते. हे पीक ४५ से पर्यंतचे ऊन सहन करू शकते. बागायती कपाशीला उष्ण व कोरडे हवामान मानवते. या कापसाला ४० ते ४५% पर्यटन उष्णता मानवते.

* जमीन - मध्यम किंवा भारी तसेच निचऱ्याची असावी. क्षारयुक्त नसावी.

* पूर्वमशागत - तीन वर्षातून एकदा खोल नगरट करणे गरजेचे असते. मृगाचा पाऊस येईपर्यंत कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या द्याव्या लागतात. मागील पिकाची धसकटे, कचरा जाळून टाकतात.

* हेक्टरी १२ ते १५ गाड्या शेणखतकुळवाच्या पाळीपूर्वी टाकून जमिनीत शेणखत मिसळतात.

* कापसाच्या जाती - देशी जात - एकेएच ४ व ५, एकेए ८४०१, अमेरिकन जाती - डीएचवाय २८६, अमेरिकन जाती - एसआरटी १, एकेएच ०८१. संकरित जाती - संकर ४, संकर ६, पी. के. व्ही. संकर २. सुधारित जाती - एलआरए - ५१६६, आरसीएच - १. संकरित जाती - वरलक्ष्मी, सावित्री, डीसीएच.

* पेरणीचा काळ - धूळ पेरणी - जूनचा पहिला किंवा दुसरा आठवडा, मान्सून पेरणी - जूनचा तिसरा किंवा चौथा आठवडा. पुणे, सातारा, सोलापूर व सांगली - मार्चचा पहिला पंधरवडा, अहमदनगर - एप्रिलचा पहिला पंधरवडा.
विदर्भ व मराठवाडा भागात तसेच धुळे, नंदुरबार, व जळगाव या जिल्ह्यामध्ये मे चा दुसरा आठवडा.

* बियाणे प्रमाण - देशी - हेक्टरी १५ ते २० किलो, अमेरिकन हेक्टरी १२ ते २० किलो, संकरित टोकण हेक्टरी ४ किलो. सुधारित जाती - हेक्टरी ७ ते ८ किलो संकरित जाती टोकन - हेक्टरी २.५ ते ३ किलो सरीवर.

* पेरणी - देशी जाती ४५ बाय - २२ सेमी, अमेरिकन ६०बाय ३० सेमी, संकरित जाती - ६० बाय ६० सेमी, ७५ बाय ७५ सेमी. लागण - सरीच्या बगलेच्या, अंतर - मध्य भागी फुलीवर ३ ते ४ बीया ४ ते ५ सेमी खोल टोकतात.

* विरळणी - प्रत्येक ठिकाणी एक जोमदार रोप ठेवून विरळणी करतात. टोकण करताना ३ ते ४ बिया रोपे टोकलेल्या असतात. विरळणी करताना २ रोपे ठेवतात.

* आंतर मशागत - २१ दिवसांनी पहिली कोळपणी केल्यानंतर आवश्यकतेनुसार ३ ते ४ कोळपण्या करतात. योग्य वेळी निंदण करून शेत स्वच्छ ठेवणे उपयुक्त ठरते. फुले येण्याच्या वेळी व नंतर ३० दिवसांनी झाल्यावर २२ % डीएपी खताच्या द्रावणाची फवारणी करणे फायद्याचे ठरते.

* पाणीपुरवठा - पावसावर अवलंबून असलेले जिरायती पीक, टोकण करताना शेत ओलवून टोकन केली जाते. त्यानंतर ३ ते ४ दिवसांनी आंबवणीचे पाणी द्यावे लागेल.

* कापसावरील रोग - तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, मावा, या किडी रसशोषण करतात. बोडअळी ही या पिकावर पडणारी महत्वाची कीड आहे.

* कापसाचे उत्पन्न - जिरायती कापूस - देशी वाणाचे हेक्टरी ७-८ क्विंटल उत्पन्न होते. अमेरिकन हेक्टरी १० ते १२ क्विंटल, अमेरिकन हेक्टरी १० ते १२ क्विंटल उत्पन्न होते. उन्हाळी बागायत कापूस - हेक्टरी २० ते ३० क्विंटल. खरीपपूर्व बागायती कपास - हेक्टरी १५ ते २० क्विंटल होते.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.