शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

देशाच्या पहिल्या महिला वकील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश - २७ एप्रिल २०१८

देशाच्या पहिल्या महिला वकील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश - २७ एप्रिल २०१८

* वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या सुप्रीम कोर्टात वरिष्ठ वकील पदावरून थेट न्यायाधीशपदी विराजमान होणार आहेत.

* सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील पदावरून त्या थेट न्यायाधीश बनणाऱ्या देशातील पहिल्या महिला बनणार आहेत. शुक्रवारी इंदू मल्होत्रा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश पदी शपथ घेण्याची शक्यता आहे.

* न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयाने संमती दिली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात न्या. आर. भानुमती या एकमेव महिला न्यायाधीश आहेत.

* १९८९ मध्ये ३९ वर्षीय एम फातिमा बीबी यांची देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

* दरम्यान उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के एम जोसेफ यांची बढती रोखण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.