शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

२] खरीप ज्वारी

२] खरीप ज्वारी 

* जमीन - मध्यम प्रतीची, निचरा होणारी, चिकण, पोयट्याची, मध्यम काळी व तांबडी जमीनही चालते. 

* पूर्वमशागत - हिवाळ्यात किंवा पूर्वीचे पीक निघाल्यावर लगेच जमिनीची नांगरट करतात. तीन - चार वेळा कुळवणी करून तण, धसकटे वेचून काढतात. शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी १२ ते १५ गाड्या शेणखत जमिनीत मिसळतात. 

* पेरणी - जून व जुलैचा पहिला आठवडा पेरणीस योग्य. चांगला पाऊस होऊन वापसा येताच पेरणी करणे योग्य ठरते. पाण्याची सोय असल्यास जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी करतात. पेरणीचे अंतर ४५×१५ सेमी इतके असते. 

* जाती - संकरित वाणात सीएचएच १,२,६ व ९ या जाती महत्वाच्या आहेत. सीएसएच १०, ११, १४, १६ या ज्वारीच्या नव्या जातीही हल्ली प्रचलित आहेत. विदर्भासाठी एसपीएच ३८८ ही संकरित जात उत्तम ठरते.  इतर सुधारित जाती एसपीव्ही ३४६, ३५१, ४६२, ४७५, व ९४६ या होत. या जाती मध्यम उंचीच्या असून त्या ११० ते १२० दिवसात तयार होतात. 

* बियाणे प्रमाण - हेक्टरी १० किलो या प्रमाणात बियाणे वापरतात. 

* रासायनिक खते - हेक्टरी ८० ते १०० किलो नत्र, स्फुरद, व पालाश द्यावे लागते. नत्राची अर्धी मात्रा, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी देतात. राहिलेले अर्धे नत्र पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी देणे सुयोग्य. 

* नांगे भरणे व विरळणी - ज्वारी पेरल्यानंतर सात-आठ दिवसात ज्वारीची उगवण समाधानकारक झाली नाही तर योग्य अंतरावर बी टोकून नांगे भारतात. विरळणीची जरूर भासल्यास पहिली विरळणी पेरणीनंतर १० दिवसांनी व त्यांनतर १० दिवसांनी केली जाते. प्रत्येक ठिकाणी एक जोमदार रोप ठेवतात. 

* आंतरपिके - जेथे शक्य असेल तेथे पट्टा पद्धतीने तूर हे आंतरपीक २:१ या प्रमाणात घेणे इष्ट होय. 

* पाणी व्यवस्थापन - ज्वारी हे अवर्षण प्रतिकारशक्ती असणारे पीक आहे. त्यामुळे  0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.