मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

गहू, हरभरा, कांदा

गहू, हरभरा, कांदा

* जमीन - गव्हासाठी मध्यम व खोल आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन सुयोग्य ठरते. ही जमीन क्षारयुक्त नसावी.

* हवामान - हे पीक थंड हवामानात चांगले येते. त्यामुळे जास्त थंडीचे प्रदेश व जास्त काळ थंडी राहणाऱ्या प्रदेशात हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. उत्तर भारताच्या तुलनेने महाराष्ट्रात थंडी व थंडीचा कालावधी कमी असलेल्या गव्हाच्या पिकाचे उत्पन्न त्या प्रमाणात मिळत नाही.

* पूर्वमशागत - जमीन लोखंडी नांगराने १५ ते २० सेमी खोल नांगरतात. त्यानंतर कुळवाच्या दोन तीन पाळया देतात.

* जाती - कोरडवाहू गव्हाच्या एन ८२२३ विनिता, एन ५९, एनआय ५४३९, एमपीएस १९६७ व कल्याणसोना या जाती प्रचलित आहेत.

* पेरणी - नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात गहू पेरतात. उशिरा पेरणी केल्यास उत्पन्नात घट येते. जिरायत गहू नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात पेरला जातो. वापसा आल्यावर दोन चाड्यांच्या पाभरीने २२.५ सेमी अंतरावर पेरणी करतात.

* पिकावरील रोग - मावा, तुडतुडे, फुलकिडे, तांबोरा हे रोग प्रामुख्याने गव्हावर पडतात.

[हरभरा]

* हवामान- या पिकाला थंड हवामान मानवते. पीक २० दिवसांचे झाल्यावर किमान तापमान १० ते १५ सेमी व कमाल तापमान २५ ते ३० से ग्रे असेल तर त्याची वाढ चांगली होती.

* जमीन - ज्या भागात खरिपात ७०० ते १,००० मिमी पाऊस पडतो अशा ठिकाणी मध्यम ते भारी जमिनीत रबी हंगामात भरपूर ओल टिकून राहते. त्यामुळे तेथे हरभऱ्याचे जिरायत पीक चांगले येते.

* पूर्व मशागत - खरीप पीक निघाल्यावर खोल नांगरट करतात. नंतर कुळवाच्या दोन पाळ्या देतात. खरीप पिकास शेणखत दिले असल्यास पुन्हा देण्याची जरुरी नसते.

* पेरणी - जिरायत हरभऱ्याची पेरणी शक्यतो सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात करतात. यासाठी खरिपाचे पीक लवकर येणारे असावे. बागायत क्षेत्रात पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत करतात.

* जाती - फुले जी १२, बीडीएन ९-३, फुले जी ५ विश्वास, विजय, विशाल, श्वेता, भारती, या सुधारित जाती आहेत.

* अलीकडील काळात राष्ट्रीय पातळीवर बागायती भागासाठी गव्हाच्या डब्लूएच ५४२, युपी २३३८, पीबीडब्लू ३४२, श्रेष्ठा व युपी २४२५ या जाती विकसित करण्यात आल्या आहेत.

* पिकावरील रोग - मावा, तुडतुडे, व घाटेअळी इत्यादी रोग या पिकावर येतात.

[कांदा]

* कांदा हे पीक कमी कालावधीत येणारे, तुनात्मकदृष्ट्या कमी भांडवली खर्चाचे, परंतु चांगले उत्पन्न मिळवून देणारे व्यापारी पीक आहे.

* कांदा उत्पादनात देशात महाराष्ट्र प्रथम आहे. महाराष्ट्रात जवळजवळ ६० लाख हेक्टर क्षेत्रावर हे पीक घेतले जाते.

* हवामान - कांदा हे मुख्यतः हिवाळी रब्बी पीक सुरवातीच्या काळात या पिकासाठी चांगली मानली जाते. भारी, चिकन, पाण्याचा निचरा होणारी जमीन कांद्यासाठी चांगली मानली जाते.

* जमीन - मध्यम ते साधारण कसदार जमीन कांद्याच्या पिकासाठी चांगली मानली जाते.

* हंगाम - खरीप हंगाम बी पेरणी मे ते जून, पुनर्लागवड - जुलै ते ऑगस्ट, काढणी - ऑक्टोबर डिसेंबर, जाती एन ५३, बसवंत ७८०, ऍग्रीफाउंड डार्करेड.

* रांगडा हळवा कांदा - बी पेरणी ऑगस्ट ते सप्टेंबर, लागवड ऑक्टोबर नोव्हेंबर, जानेवारी - मार्च, पुसारोड, एन २ ४ १ ऍग्रीफाउंड, डार्करेट, अरका निकेतन.

* रबी उन्हाळी किंवा गरम कांदा - बी पेरणी ऑक्टोबर नोव्हेंबर, पुनर्लागवडीचा काळ - डिसेंबर जानेवारी, काढणी एप्रिल व मे, पुसारोड पुसारोड, एन २ ४ १ ऍग्रीफाउंड, डार्करेट, अरका निकेतन.

* पिकावरील रोग - फुलकिडे, टाक्या-मुरड्या, पाने कुरतडनारी अळी. करपा, काळा करपा रोग.

* उत्पन्न - सर्वसाधारणपणे खरीप कांद्याचे दर  हेक्टरी उत्पन्न १५० ते २०० क्विंटल येते. तर रबी कांद्याचे उत्पन्न हेक्टरी २५० ते ४०० क्विंटल येते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.